एक्स्प्लोर

केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचं निधन

अनंत कुमार सध्या केंद्रीय रासायनिक खते आणि संसदीय कामकाज या दोन खात्यांचा कारभार पाहत होते.

बंगळुरु : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अनंत कुमार यांचं कर्करोगाने निधन झालं. कर्नाटकच्या बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी आज वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेली कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी ठरली. अनंत कुमार यांच्यावर सुरुवातीला लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर 20 ऑक्टोबरला त्यांना बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी बंगळुरुतील नॅशनल कॉलेजमध्ये ठेवण्यात येणार आहे. अनंत कुमार यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती त्यांच्या पत्नीने मागील आठवड्यात शुक्रवारीच दिली होती. परंतु त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यांना काही दिवस आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पंरतु आज त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान अनंत कुमार यांच्या निधनामुळे आज कर्नाटकात तीन दिवसांचा दुखवट जाहीर करण्यात आला आहे. तर आज एक दिवसाची सुट्टी घोषित केली आहे. अनंत कुमार यांचा राजकीय प्रवास अनंत कुमार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी झाला होता. ते तब्बल सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. 1996 पासून ते बंगळुरु दक्षिण मतदारसंघातून लोकसभा खासदार होते. अनंत कुमार सध्या केंद्रीय रासायनिक खते आणि संसदीय कामकाज या दोन खात्यांचा कारभार पाहत होते. सुरुवातीला त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. त्यानंतर विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपमध्ये सामील झाले. अनंत कुमार हे कर्नाटक भाजपचे माजी अध्यक्षही होते. राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शोक अनंत कुमार यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह तसंच इतर नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. "केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या निधनाने अतिशय दु:ख झालं. त्यांच्या जाण्याने देश आणि विशेषत: कर्नाटकच्या जनतेला मोठा धक्का बसला आहे. त्यांचं कुटुंब, सहकारी आणि त्यांच्याशी संबंधित अगणित लोकांचं मी सांत्वन करतो," अशी प्रतिक्रिया राष्ट्रपतींनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर लिहिलं आहे की, “माझे सहकारी आणि मित्र अनंत कुमार यांच्या निधनाचं वृत्त मिळताच मला फार दु:ख झालं. ते उत्तम नेते होते, त्यांनी तारुण्यात राजकारणात प्रवेश केला आणि शेवटपर्यंत अतिशय मेहनतने लोकांची सेवा केली. त्यांना कायमच चांगल्या कामांसाठी ओळखलं जाईल.”

महत्त्वाच्या बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? 2026 पर्यंत लोकसंख्येत किती वाढ? 
स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? देशाच्या लोकसंख्येत 2026 पर्यंत किती वाढ?
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Rahul Gandhi : मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Embed widget