एक्स्प्लोर
केरळमधील जलप्रलय 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' जाहीर
केरळमध्ये पावसाने आतापर्यंत 400 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक बेघर झाले आहेत. ही गोष्ट लक्षात घेत ही गंभीर नैसर्गिक आपत्ती असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलं.
नवी दिल्ली : केरळमधील पूरस्थितीला केंद्रीय गृहमंत्रालयाने 'गंभीर नैसर्गिक आपत्ती' घोषित केलं आहे. केरळमध्ये पावसाने आतापर्यंत 400 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक बेघर झाले आहेत. ही गोष्ट लक्षात घेत ही गंभीर नैसर्गिक आपत्ती असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलं.
केरळमधील पूर ओसरला असला तरी अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. त्यामुळे जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. हजारो घरं पुरात वाहून गेल्यामुळे नागरिक बेघर झाले आहेत. सव्वा दोन लाखांपेक्षा जास्त नागरिक सध्या रिलीफ कॅम्पमध्ये राहत असून सरकारकडून त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्तीचा बळी ठरलेल्या केरळसाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी केरळसाठी कोट्यवधींची मदत जाहीर केली आहे. तर कपडे, अन्न, स्वच्छ पाणी अशा उपयोगी वस्तूही पाठवण्यात येत आहेत. केरळच्या तुरुंगातील कैदीही पूरग्रस्तांसाठी अन्न बनवून देत आहेत.
पेट्रोल-डिझेलसाठी रांगा
पूर ओसरु लागल्यानंतर केरळात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलसाठी वाहनांच्या रांगा लागत आहेत. पदककुडी गावात महामार्गालागत सुरू असलेल्या एकमेव पेट्रोल पंपावर भल्या मोठया रांगा लागल्या आहेत. अनेक वाहनं बंद अवस्थेत असल्यानं शेकडो प्रवासी अद्यापही अडकून पडले आहेत. तर बऱ्याच पुलांवर मोठी झाडं, टीव्ही, फ्रिज अश्या अनेक गोष्टी वाहून आलेल्या आहेत. केरळातल्या पुरात आत्तापर्यंत 370 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत.
1924 नंतर पहिला मोठा पूर
केरळचे मुख्यमंत्री पिनारई विजयन यांनी केरळच्या प्रलयाबाबत माध्यमांना माहिती दिली. 1924 नंतर केरळमध्ये पहिल्यांदाच इतका मोठा पूर आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
पुरात अडकलेल्या लोकांचा जीव वाचवण्याला आमचं प्राधान्य आहे. महापुराचा प्रलय आता थांबेल असं दिसतंय. पाणी ओसरु लागलं आहे. राज्यात मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आम्ही सर्वप्रकारची मदत स्वीकारत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
संबंधित बातम्या :
केरळमधील जलप्रलयानंतर आता आजारांचा धोका
केरळ महापूर : मृतांची संख्या 357 वर
केरळसाठी केंद्राकडून 500 कोटींची मदत
VIDEO : केरळ पूर : गर्भवती महिलेला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने वाचवलं!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement