India Ukraine Flight : रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, आता कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (Ministry of Corporate Affairs) MoCA एअर बबल व्यवस्थेअंतर्गत भारत-युक्रेन (India Ukraine) दरम्यानच्या फ्लाईट्सची संख्या आणि फ्लाईट दरम्यानच्या जागांच्या संख्येवरील निर्बंध हटवले आहेत. MoCA ने ही माहिती दिली आहे. MoCA नुसार, कितीही उड्डाणे आणि चार्टर उड्डाणे चालू शकतात. वाढत्या मागणीमुळे भारतीय विमान कंपन्यांनी उड्डाणे वाढविण्याची माहिती दिली आहे. MoCA परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधत आहे.


 






 


युक्रेनमध्ये परिस्थिती सुधारत आहे का?


युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्य तैनात केल्यानंतर परिस्थिती सतत बिघडत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अमेरिका आणि रशिया यांच्यात जोरदार भाषणबाजीही सुरू झाली होती. युक्रेनवरून दोन्ही देश एकमेकांशी भिडतील, असे एकेकाळी वाटत होते. पण 15 फेब्रुवारीला रशियाने आपले सैन्य तळावर परत पाठवण्याची घोषणा केल्याचे सांगण्यात आले. युक्रेनवर हल्ला करण्याचा त्यांचा कधीही हेतू नव्हता, या संदर्भात जे काही बोलले जात होते, त्याला कोणताही आधार नव्हता. असेही रशियाकडून सांगण्यात आले आहे. या संदर्भात जे काही बोलले जात होते, त्याला कोणताही आधार नव्हता. 


 





तिसऱ्या महायुद्धाचा होता धोका


रशिया-युक्रेनमध्ये युद्ध झाले असते तर तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली असती. युक्रेनच्या बाजूने अमेरिकेसह युरोपीयन देशांनी मदत करण्याचे जाहीर केले होते. नाटो सदस्य देशांनी आपले सैन्यही सज्ज ठेवले होते. तर, रशियाने चीनसोबत चर्चा केली होती. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha