Russia Ukrain :  रशियाने युक्रेनच्या सीमेवरून सैन्य माघारी घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर काही प्रमाणात तणाव निवळला होता. मात्र, रशियाने सैन्य माघारीची घोषणा करूनही त्या ठिकाणी आणखी 7000 सैन्य तैनात केली असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. रशियाची घोषणा खोटी असून युक्रेनवर हल्ला करण्यासाठी या सैन्याचा वापर होऊ शकतो असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी 'एसोसिएटेड प्रेस'ला नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 


अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी 'एबीसी न्यूज'ला सांगितले की, आम्ही रशियन सैन्य माघारी जाताना पाहिले नाही. पुतीन कधीही हल्ला करू शकतात. युक्रेनवर हल्ला करायचा असल्यास त्यासाठी ही सुसज्जता असल्याचे त्यांनी म्हटले. 


नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग म्हणाले की युतीने "रशियन सैन्याने माघार घेतल्याचे आम्ही पाहिले नाही. ब्रुसेल्समध्ये नाटो गटांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या आधी त्यांनी हे वक्तव्य केले. रशियाने खरंच सैन्य माघारी घेतले असतील तर आम्ही त्याचे स्वागत करू असेही त्यांनी म्हटले. 


रशियाने काय म्हटले ?


मंगळवारी 15 फेब्रुवारी रोजी रशियन संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले होते की, युक्रेनजवळ तैनात असलेल्या काही सैन्यांनी त्यांचे सराव पूर्ण केला असून ते माघारी निघणार आहेत. युद्ध टाळण्याचे  राजनैतिक प्रयत्नही सुरू होते. त्यानंतर रशियाने हे पाऊल उचलले आहे. 


तिसऱ्या महायुद्धाचा होता धोका


रशिया-युक्रेनमध्ये युद्ध झाले असते तर तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली असती. युक्रेनच्या बाजूने अमेरिकेसह युरोपीयन देशांनी मदत करण्याचे जाहीर केले होते. नाटो सदस्य देशांनी आपले सैन्यही सज्ज ठेवले होते. तर, रशियाने चीनसोबत चर्चा केली होती. 


 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha