Ukraine-russia stand off : युक्रेनवरील संकट गंभीर होत असताना, मोठी बातमी समोर येत आहे. युक्रेनच्या सीमेजवळ रशियन सैन्याने (Russian Army) माघार घेतली आहे. रशिया युक्रेनजवळ तैनात असलेल्या सैन्याला पुन्हा लष्करी तळावर पाठवत आहे. एएफपी वृत्तसंस्थेनुसार, रशियाचे म्हणणे आहे की, युक्रेनजवळ तैनात असलेले काही लष्करी जवान त्यांच्या तळांवर परतत आहेत. रशियाने मंगळवारी सांगितले की, युक्रेनच्या सीमेजवळील त्यांच्या बेस कॅम्पमध्ये काही सैन्य परतत आहेत. अमेरिका आणि रशियामध्ये वाढता तणाव आणि संकटाच्या पार्श्वभूमीवर, डी-एस्केलेशनच्या दिशेने पहिले मोठे पाऊल मानले जात आहे.


युक्रेन संकट टळले आहे का?
मंगळवार 15 फेब्रुवारी रोजी सकाळी, रशियन संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की युक्रेनजवळ तैनात असलेल्या काही सैन्यांनी त्यांचे सराव पूर्ण केले आहेत आणि ते निघण्याच्या तयारीत आहेत. आक्रमण टाळण्याचे राजनैतिक प्रयत्नही बराच काळ चालू होते. त्यानंतर रशियाने हे पाऊल उचलले आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी रशियन वृत्तसंस्थांना सांगितले की, दक्षिण आणि पश्चिम लष्करी जिल्ह्यांतील युनिट्सने त्यांचे कार्य पूर्ण केल्यानंतर त्यांची शस्त्रे आणि सामान आज पाठवून दिले आहेत. लष्करी तळावर परतण्यासाठी किती तुकड्यांचा समावेश होता आणि या माघारीचा युक्रेनजवळील एकूण सैन्याच्या संख्येवर कसा परिणाम होईल? हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.


रशियन सैन्याच्या माघारीच्या घोषणेने संकट टळण्याची शक्यता


सध्या रशियन सैन्याच्या माघारीच्या घोषणेने संकट टळण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्याकडून येऊ शकते, कारण जर्मनीचे चांसलर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चेसाठी मंगळवारी मॉस्कोमध्ये उपस्थित होते. दरम्यान युक्रेन- रशियावरील संकट टळण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. कारण  रशियाच्या सैन्याने सीमेवरून माघार घेतल्याचे समजते. सोमवारी, व्लादिमीर पुतिन यांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांच्या टिप्पण्यांमुळे डी-एस्केलेशनची आशा निर्माण झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून युक्रेनच्या मुद्द्यावरचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. रशिया लवकरच युक्रेनवर हल्ला करू शकतो, असा दावा अमेरिकेने केला होता. त्याचवेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनीही दावा केला की रशिया 16 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला करेल. असे म्हटले होते. 


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha