ITBP Viral Video : राज्यात सध्या राजकीय घमासान सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकीत आपण कसे जनतेचे कैवारी हे दाखवण्याची जणू राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धाच लागली आहे. मात्र जनतेचे खरे कैवारी आणि रक्षणकर्ते कोण? हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
भारत-चीन सीमेवर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP) हाडं गोठवणाऱ्या थंडीत देशाच्या सीमांवर पाय रोवून उभे आहेत. सध्या उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट आहे. उत्तराखंडमध्ये 15 हजार फूट उंचीवर हे जवान देशाचं संरक्षण करत आहेत.
सध्या हा व्हिडीओ भारत चीन सीमेवरचा आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस या भागात सीमेचं प्राणपणानं रक्षण करत आहेत. सध्या उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट आहे. मात्र थंडी, वारा, हिमवर्षाव कशाचीही तमा न बाळगता आयटीबीपीचे हे जवान हाडं गोठवणाऱ्या थंडीत देशाच्या सीमांवर पाय रोवून उभे आहेत. हा व्हिडीओ उत्तराखंडच्या कुठल्या भागातला आहे हे, नक्की सांगता येणार नाही. मात्र 15 हजार फूट उंचीवर हिमाद्रीच्या रक्षणार्थ उभे असलेले हे जवान, हेच खरे जनतेचे कैवारी आहेत. या जवानांच्या धैर्याला आणि त्यांच्या समर्पणभावाला एबीपी माझाचा सलाम.
व्हिडीओ पाहता येईल की, सैनिकांच्या खांद्यावर शस्त्रं लटकलेली असून हातात काठी घेऊन ते पुढे जात आहेत. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, बर्फाची खोली सैनिकांच्या गुडघ्यापर्यंत आहे, त्यामुळे सैनिकांना पुढे जाण्यात अडचण येत असली तरी ते न थांबता पुढे जाताना दिसत आहेत. 15,000 फूट उंचीवर बर्फाळ भागांत गस्त घालत असलेल्या सैनिकांचा व्हिडीओ पाहून लोक त्यांच्या धैर्याला सलाम करत आहेत.
ITBP देशाचं आघाडीचं निमलष्करी दल
दरम्यान, इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस दलाची स्थापना 1962 मध्ये झाली होती. सीमेव्यतिरिक्त आयटीबीपीचे जवान नक्षलविरोधी कारवायांसह इतर कारवायांमध्ये तैनात करण्यात आलं आहे. ITBP हे देशातील आघाडीचं निमलष्करी दल आहे. या दलातील जवान त्यांच्या कठोर प्रशिक्षण आणि व्यावसायिकतेसाठी ओळखले जातात. त्याच वेळी, ते कोणत्याही परिस्थिती आव्हानाला तोंड देण्यासाठी नेहमी तयार असतात. वर्षभर हिमालयाच्या कुशीत बर्फाच्छादित फॉरवर्ड पोस्टवर राहून देशाची सेवा करणं हे त्यांचं मूलभूत कर्तव्य आहे, म्हणून त्यांना 'हिमवीर' म्हणूनही ओळखलं जातं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Gujarat : वरदायिनी देवीच्या मंदिराची डॉलरनं सजावट ; अमेरिकेहून भक्तानं पाठवल्या नोटा
- कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अनावश्यक निर्बंध दूर करा; केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha