Coronavirus Cases Today in India : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव सुरुच आहे. अशातच आज पुन्हा देशातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत पुन्हा काहीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 30 हजार 757 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 541 रुग्णांचा मृत्यू (Covid Deaths) झाला आहे. अशातच काल दिवसभरात 30 हजार 615 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. म्हणजेच, कालच्या तुलनेत आजच्या दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकड्यात किंचितशी वाढ झाली आहे. जाणून घेऊया देशातील कोरोनाची सद्यस्थिती... 


सक्रिय रुग्णांमध्ये घट, रुग्णसंख्या 3 लाख 32 हजार 918 वर 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन 3 लाख 32 हजार 918 वर पोहोचली आहे. अशातच या महामारीत जीव गमावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन 5 लाख 10 हजार 413 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 19 लाख 10 हजार 984 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 





राज्यात कोरोनासंख्या आटोक्यात, बुधवारी 2 हजार 748 नव्या रुग्णांची भर


राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाच्या 2 हजार 748 नव्या रुग्णांची भर पडली आहे. कालच्या तुलनेत काल रुग्णसंख्या किंचीत वाढली असून 41 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 5 हजार 806  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


राज्यात काल (बुधवारी) 111ओमायक्रॉनबाधितांची नोंद  


राज्यात काल (बुधवारी) 111 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली.आतापर्यंत 4456 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 3334 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 1,122 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.


मुंबईत 255 नवे कोरोना रुग्ण आढळले


मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 255 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 439 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. काल एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 2 हजार 115 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 255 रुग्णांपैकी 23 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अनावश्यक निर्बंध दूर करा; केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha