एक्स्प्लोर

उद्धव ठाकरे दिल्लीत, राष्ट्रपती निवडणुकीबाबत खलबतं

मुंबई/नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये आज होणाऱ्या एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीतल्या प्रवासी भारतीय भवनमध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता एनडीएची बैठक होत आहे. त्याआधी उद्धव ठाकरे हे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी सेना खासदारांची भेट घेणार आहे. दरम्यान यूपीत भाजपल्या मिळालेल्या विजयाच्या निमित्तानं एनडीएची ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं बोललं जातंय. मात्र प्रत्यक्षात या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीवर खलबतं होणार असल्याचं समजतंय.

तीन वर्षांनंतर मोदी-शाह आणि उद्धव ठाकरे आमने-सामने येणार

मोदींच्या शपथविधी सोहळ्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे मोदी आणि शहा या जोडीला भेटणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर म्हणजे जवळपास मे 2014 नंतर तीन वर्षांनी उद्धव ठाकरे मोदी-शाहांना दिल्लीत भेटतील. याआधी दोनवेळा उद्धव ठाकरे दिल्लीत येऊन गेले, मात्र तेव्हा ते केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनाच भेटले होते. दिल्लीतल्या प्रवासी भारतीय भवन इथे संध्याकाळी साडे सहा वाजता ही बैठक होणार आहे. निमित्त यूपीच्या विजयाचं असलं तरी राष्ट्रपती निवडणुकीची चर्चा होणार आहे. दिल्लीत येऊनही उद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांना न भेटणं हे शिवसेना-भाजपमधल्या वाढत्या तणावाचंच लक्षण होतं. याआधी एनडीएचं सरकार असताना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी कधी मुंबईत आले तर ते आवर्जून मातोश्रीवर बाळासाहेबांची भेट घ्यायचे. पण मोदी-शाहांच्या युगात चित्र बदलत गेलं. मुंबईत मोदी आल्यावरही कधी मातोश्रीकडे फिरकले नाहीत. या दोघांची शेवटची मुंबईतली भेट ही शिवस्मारकाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानेच व्यासपीठावर झाली होती. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या या दिल्ली भेटीला जास्त महत्व प्राप्त झालं आहे. मोदी आणि उद्धव ठाकरेंची किमान काही सरकारी कार्यक्रमाच्या निमित्ताने तरी भेट झाली. पण उद्धव ठाकरे आणि अमित शाह हे तर तब्बल तीन वर्षांनी आमने-सामने असतील. महाराष्ट्रात एकत्रित सत्तेत असूनही मुंबई महापालिका निवडणुकीच्या दरम्यान भाजप आणि शिवसेनेतले मतभेद शिगेला पोहोचले होते. अगदी अफझलखानाच्या टोळ्या वगैरे शेलकी विशेषणंही अमित शाहांसाठी वापरण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आता या भेटीनंतर शिवसेना-भाजपमधलं वातावरण कितपत निवळतं हे पाहणं औत्सुक्याचं असेल. संबंधित बातम्या

तीन वर्षांनंतर मोदी-शाह आणि उद्धव ठाकरे आमने-सामने येणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget