एक्स्प्लोर

तुमच्या चेकवरची अक्षरे नष्ट करणाऱ्या पेनचं व्हायरल सत्य

नवी दिल्ली: तुमच्या बँक अकाऊंडवर तुमच्याच चेकने दरोडा टाकला जातोय का? असा प्रश्न तुम्हाला विचारला, आणि त्याचे उत्तर तुम्ही नाही असेल, तर थोडं थांबा. कारण सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओने धूमाकुळ घातला असून, या व्हिडीओमधून तुम्ही दिलेल्या चेकवरील अक्षरे आणि आकडे सहज नष्ट करता येतात, असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे नोटाबंदीनंतर चेकच्या माध्यमातून पेमेंट करणे अनेकांची डोकेदुखी झाली आहे. एकीकडे आर्थिक व्यवहारासाठी चेक हे सर्वात सुरक्षित माध्यम मानले जाते, पण या व्हिडीओमुळे  तुमच्याच चेकवरुनच तुमच्या अकाऊंटवर दरोडा घातला जाण्याची भिती अनेकांना वाटत आहे. या व्हिडीओत दावा केल्याप्रमाणे एखादे पेन अशाप्रकारे चेकवरील अक्षरे आणि आकडे नष्ट करु शकतात का? असा प्रश्न यातून उपस्थित होत आहेत. व्हॉटसअॅपवर व्हायरल होणाऱ्या चार मिनीटाच्या या व्हिडीओने अनेकांची झोप उडवली आहे. कारण असा काहीसा प्रकार, दुर्घटना आपल्यासोबतही घडू शकेल, याचीच चिंता अनेकांना सतावत आहे. आम्ही याला जाणूनबुजून दुर्घटना हा शब्द वापरत आहोत. कारण तुमच्याच चेकच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला कितीही मोठी रक्कम दिली जाऊ शकते, असा दावा या व्हिडीओमधून करण्यात येत आहे. वास्तविक, या व्हिडीओमधील संबंधित व्यक्ती एका चेकवरील पाच हजार रुपयांचे अक्षरे सहज नष्ट करताना दिसत आहे. या चेकवर 16 फेब्रुवारी 2016 तारीख असल्याचेही या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. यानंतर ही व्यक्ती त्या चेकवरील इंग्रजीत लिहलेले पाच हजारांचे शब्द एका पेनने नष्ट करते. यानंतर १५ सेकंदातच या चेकवरील पाच हजार रुपये लिहलेले शब्द गायब झाल्याचे दिसतात. पुन्हा ती व्यक्ती त्याच पेनच्या सहाय्याने पाच हजाराचे आकड्यांसमोरील चिन्ह नष्ट करते, जेणेकरुन चेकवरील रक्कम वाढवता येईल. यानंतर जिथे पाच हजार अक्षरी लिहले होते, तिथे पन्नास हजार इंग्रजीत लिहून पाच हजाराचे आकड्यांच्या जागी 50 हजार रुपये लिहतो. हा सर्व प्रकार ३० सेकंदात घडतो. या पेनच्या माध्यमातून चेकवरील अक्षरे आणि आकडे नष्ट करताना, केवळ साध्या पेनेची शाईच नष्ट होते. चेकवरील लाईन, आणि प्रिंट असलेले इतर शब्द नष्ट होत नाहीत. त्यामुळे चेकमधील ही हेरफार सर्वसामान्यांना पकडणे अतिशय अवघड आहे. तेव्हा जर हे खरंच असेल तर हा ब्लँक चेकचाच प्रकार आहे. कारण यामाध्यमातून केवळ चेकवरील रक्कमच नव्हे, तर नावही बदलून तुमचे बँक खाते सहज रिकामे होऊ शकते. त्यामुळे असा कोणता पेन खरंच अस्तित्वात आहे का?  यामगचे सत्य काय आहे हे समोर येणे गरजेचे आहे. एबीपी न्यूजने व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या व्हायरल व्हिडीओची पडताळणी करण्यासाठी एबीपी न्यूजच्या प्रतिनिधी अंजली सिंह यांनी बाजारात असा कोणता पेन उपलब्ध आहे का? याचा शोध घेतला. यावेळी अंजली यांना पेन मिळाला नसला, तरी अशाप्रकारची एक पेन्सिल मिळाली. या पेन्सिलच्या माध्यमातून चेकवर लिहलेली अक्षरे आणि आकडे नष्ट करता येत होती. व्हायर व्हिडीओतील पेन आणि अंजली यांना मिळालेल्या पेन्सिलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फॉरेन्सिक केमिस्ट्रीतील तज्ज्ञ डॉक्टर एस. के. शुक्ला यांच्याशी संपर्क सांधला. यावेळी त्यांना अशाप्रकारचा पेन असू शकतो का? असा प्रश्न विचारला. तेव्हा, त्या व्हायरल व्हिडीओमध्ये जो पेन दाखवण्यात येत आहे, तो पेन वास्तवात चेकवरील शाई नव्हे, तर त्याचा रंग नष्ट करत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यामुळे आपण लिहलेली रक्कम पाहू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. व्हायरल व्हिडीओमधील पेनच्या शाईत एक असे केमिकल वापरले आहे, ज्यामुळे लिहलेली अक्षरे सहज नष्ट करता येतात, असे आपल्याला जाणवते. विशेष म्हणजे, अशाप्रकारच्या पेनची शाई रेग्यूलर पेनेपेक्षा वेगळी असल्याची माहिती त्यांनी दिली. म्हणजे, एकीकडे ते तुमच्याकडून चेक लिहून घेतील, आणि त्यावरील अक्षरे नष्ट करुन आपल्याला हवी तशी रक्कम टाकून तुमचे खाते रिकामे करतील. त्यामुळे चेकवर सही करताना दुसऱ्याचा पेन वापरताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहेच.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Gold Silver Rate : सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Mayor Reservation : मुंबई, पुणे, नागपूरसह 15 महापालिकांमध्ये महिलाराज, महापौरपदाचा मान महिलांना, संपूर्ण यादी
राज्यातील 15 महापालिकांमध्ये महिला राज, मुंबई- नागपूरमध्ये महिला महापौर होणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर

व्हिडीओ

KDMC Mayor Reservation News : कल्याण डोंबिवलीत या तिघांना महापौरपदाची संधी
KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्गाला आरक्षणाला
KDMC Mayor : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?
Sanjay Raut Shivsena : सत्तास्थापनेसाठी श्रीकांत शिंदेंच्या मनसे नेत्यांसोबत बैठका, राऊत काय म्हणाले?
KDMC Thackeray vs Thackeray : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Gold Silver Rate : सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Mayor Reservation : मुंबई, पुणे, नागपूरसह 15 महापालिकांमध्ये महिलाराज, महापौरपदाचा मान महिलांना, संपूर्ण यादी
राज्यातील 15 महापालिकांमध्ये महिला राज, मुंबई- नागपूरमध्ये महिला महापौर होणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
KDMC Mayor: बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
Maharashtra Municipal Corporation Reservation 2026 मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
Pune pimpri chinchwad Mayor Reservation: पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये महिला राज; महापौरपदाची सोडत जाहीर, कोणत्या महिला नेत्यांना मिळणार संधी?
पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये महिला राज; महापौरपदाची सोडत जाहीर, कोणत्या महिला नेत्यांना मिळणार संधी?
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम मांडीला मांडी लावून बसणार; सत्तेसाठी दोन्ही पक्षांची एकमेकांना साथ
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम मांडीला मांडी लावून बसणार; सत्तेसाठी दोन्ही पक्षांची एकमेकांना साथ
Embed widget