एक्स्प्लोर
Advertisement
ईशान्य भारतात मोदी लाट, त्रिपुरात भाजप, मेघालयमध्ये त्रिशंकू
डाव्यांचा गड मानला जाणाऱ्या त्रिपुरात भाजपने मोठं यश मिळवलं. गेल्या 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्यांचा पराभव करत भाजपने त्रिपुरामध्ये बहुमत मिळवलं आहे.
आगरतळा : 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी ईशान्य भारतात मोदी लाट दिसून आली. त्रिपुरात तब्बल 25 वर्ष सत्तेत असणाऱ्या डाव्यांना धक्का देत जनतेने भाजपला बहुमत दिलं. तर नागालँडमध्येही भाजपने मुसंडी मारली आहे. शिवाय मेघालयमध्ये सत्ताधारी काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे.
त्रिपुरा राज्यातल्या 60 पैकी 43 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर डाव्यांना फक्त 17 जागांवर समाधान मानावं लागलं. गेल्या निवडणुकीत 10 जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला यंदा त्रिपुरात खातंही उघडता आलं नाही.
मेघालयात मात्र काँग्रेसने चांगली कामगिरी करत 60 पैकी 21 ठिकाणी आघाडी घेतली. माजी लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे चिरंजीव कोनार्ड संगमा यांच्या एनपीपी अर्थात नॅशनल पीपल्स पार्टीने या ठिकाणी 19 जागांवर आघाडी घेतली. भाजपचे 2 तर इतरांचे 11 उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र कुणालाच स्पष्ट बहुमत नसल्यामुळे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.
नागालँडमध्ये भाजपने 60 पैकी 27, एनपीएफनेही 27 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसच्या खात्यात एकही जागा नाही.
त्रिपुरात भाजपला स्पष्ट बहुमत
डाव्यांचा गड मानला जाणाऱ्या त्रिपुरात भाजपने मोठं यश मिळवलं. गेल्या 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्यांचा पराभव करत भाजपने त्रिपुरामध्ये बहुमत मिळवलं आहे. 60 जागा असलेल्या त्रिपुरा विधानसभेत भाजप आणि मित्रपक्षाने 41 जागांवर विजय मिळवला, तर दोन जागांवर आघाडी आहे. सीपीआयला केवळ 13 जागांवर विजय मिळाला, तर तीन जागांवर आघाडी आहे.
नागालँडमध्येही भाजपच्या सत्तेची चिन्हं
नागालँडमध्ये काँग्रेसला खातंही उघडता आलेलं नाही. भाजप 27 आणि एनपीएफ 27 जागांवर आघाडीवर आहे. तर चार अन्य पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. स्थानिक समीकरणं पाहता 60 जागा असलेल्या नागालँड विधानसभेत भाजपच्या सत्तेची चिन्हं आहेत.
मेघालयमध्ये त्रिशंकू परिस्थिती
60 जागा असलेल्या मेघालयमध्ये त्रिशंकू परिस्थिती आहे. काँग्रेस 21, यूडीपी 6, भाजप 2 आणि एनपीपी 19 जागांवर, तर अन्य 11 उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मेघालयमध्ये दाखल झाले आहेत.
मेघालयचा संपूर्ण निकाल
- भाजप - 2
- काँग्रेस - 21
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - 1
- हिल स्टेट पीपल्स डेमोक्रेटीक पार्टी - 2
- नॅशनल पीपल्स पार्टी - 19
- पीपल्स डेमोक्रिटीक फ्रंट - 4
- अन्य - 4
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
हिंगोली
निवडणूक
ट्रेडिंग न्यूज
निवडणूक
Advertisement