Trending News : भारतीय लष्कराचे जवानांना नेहमी आपण शत्रूची दैना उडवताना पाहतो. भारतीय सैन्य दलातील जवान हिवाळा, उन्हाळा असो वा पावसाळा जीवाची पर्वा न करता देशाच्या सेवेत आपल्या प्राणांची आहुती देतात. अशा परिस्थितीत देशभरातील भारतीय सेवेतील सैनिकांबद्दल सर्वांच्याच हृदयात प्रेम आणि सन्मान आहे. भारतीय लष्कराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.


अलीकडेच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात भारतीय लष्कराचे जवान 'खुकुरी डान्स' करताना दिसत आहेत. ANI ने ट्विटरवर हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सैनिक बर्फाच्छादित भागात एकत्र खुकरी डान्स करताना दिसत आहेत. याशिवाय बर्फाच्या दाट चादरीत सैनिक हिंडताना आणि नाचतानाही दिसत आहेत. यावेळी कडाक्याच्या थंडीत भारतीय लष्कराचे नऊ जवान राष्ट्रध्वजाच्या पुढे ‘खुकुरी डान्स’ करताना दिसले.


पाहा व्हिडीओ



व्हिडिओ शेअर करताना माहिती देताना ANI ने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''भारतीय लष्कराच्या जवानांनी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरच्या बर्फाच्छादित रेंजमध्ये 'खुकुरी डान्स' केला.'' सध्या हा व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 4 लाख 8 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.


कडाक्याच्या थंडीतही खुकरी नृत्य केल्याबद्दल भारतीय लष्कराच्या या जवानांना सध्या सर्वजण सलाम करत आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, ''सीमेच्या रक्षकांचा आम्हाल अभिमान आहे! तुमचे धैर्य, क्षमता, भक्ती आणि देशभक्ती आपल्या भारताला संकटांपासून सुरक्षित ठेवते. राष्ट्र तुमचे ऋणी आहे. जय हिंद वंदे मातरम!''



महत्त्वाच्या बातम्या :


Deltacron : ओमायक्रॉननंतर आता डेल्टाक्रॉन, 'या' देशात सापडला कोरोनाचा नवा प्रकार


हिरकणीचा वारसा इथल्या लेकींच्या जिद्दीत! आईसोबत 18 महिन्याच्या चिमुकलीने सर केलं कळसुबाई


Health Tips : हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास होत असेल तर रोज 'हा' लाडू खा, होतील अनेक फायदे


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha