नाशिक : महाराष्ट्र म्हणजे विरांची भूमी.... या विरांच्या भूमीत अनेक हिरकण्या जन्माला आल्या. त्या हिरकणीचा वारसा इथल्या लेकींच्या जिद्दीत आहे याची सर आणखी एकदा आली आहे. सोलापुरातल्या श्रुती गांधी आणि त्यांच्या केवळ 18 महिन्यांच्या चिमुकलीने राज्यातील सर्वोच्च शिखर, कळसुबाई सर केलं...तेही अवघ्या साडे तीन तासात. 


केवळ अठरा महिन्यांची मुलगी उर्वी प्रितेश गांधी. या चिमुकलीने न थकता आपल्या आईसोबत साडे तीन तासात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई सर केले. आपण आपल्या आईसोबत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई सर केलं, एवढा अवघड ट्रेक केला याचं किती मोठं अप्रूप मोठ्यांना वाटतं हे कळण्याचं तीच वयही नाही. 


शिवविचारांच्या तत्वांवर चालणारी, शिवविचार आचरणात आणणारी, ट्रेकिंगचं वेड असणारी, निसर्गाची प्रचंड आवड असणारी अशीच उर्वीची आई श्रुती प्रितेश माने गांधी. गडकिल्यांवर भरभरून प्रेम करणारी, शिवविचार आपल्या मुलीमध्ये तिच्या जन्मापासूनच रुजवणारी अशी आजच्या काळातील हिरकणी. सोलापूर या शहरातील प्रितेश गांधी यांच्या पत्नी सौ. श्रुती प्रितेश  माने  गांधी यांना गडकिल्ले भ्रमंतीची प्रचंड आवड आहे. त्यांनी उर्वीचा पहिला वाढदिवस कळसुबाईवर साजरा करण्याचे योजले होते. परंतु कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. 


रविवारी दिनांक 9 जानेवारी 2022 रोजी त्यांनी व त्यांची मुलगी उर्वी हिने पहाटे सुमारे साडे चार वाजता आपल्या कळसुबाई शिखर सर करायला सुरुवात केली आणि सकाळी 8 वाजता त्यांनी शिखर सर केला. म्हणजे तब्बल साडेतीन तासांतच या मायलेकींनी कळसुबाई सर केला. या आधीही या मायलेकींनी भरपूर ट्रेक केलेले आहेत. कळसुबाई शिखर सर करून या मायलेकींनी नवा विक्रम तर केलाच आहे पण आपण विसरत चाललेल्या शिवविचारांचा ठेवा फक्त आपल्यातच न ठेवता तो आपल्या मुलांना दिला पाहिजे हाच संदेश दिला.


आधीपासून उर्वीच्या आईला ट्रेकिंगची आवड असल्याने तीच आवड आज उर्वीमध्ये आलेली असावी आणि त्याच आवडीवर आज या छोट्या उर्वीने कळसुबाई शिखर सर केला. आपल्या आईचा विश्वास सार्थ ठरवून तिला 21 व्या शतकातील हिरकणीचा मान मिळवून दिला.


महत्त्वाच्या बातम्या :