India Weather Update: देशात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. जम्मू-काश्मीरपासून राजस्थानमध्ये ठंडी वाढत आहे. उत्तर, पश्चिम आणि मध्य  भारतात किमान तापमाणात घट झाली आहे. तर आज देशातील बिहार, आसाम, अरूणाचल प्रदेश आणि मराठवाड्यातील काही भागांसह दक्षिण लामीळनाडू, केरळ व अंदमान निकोबारच्या काही भाात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 


मुंबई गारठली
राज्यात मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाल्याने ठंडी वाढली आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सोमवारी नाशिक येथे राज्यातील सर्वात कमी म्हणजे 7.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर जळगावात 9 अंश किमान तापमान नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रात पुण्यासह, सांगली, सातारा, सोलापूर आणि अहमदनगरमध्ये किमान तापमान सरासरीच्या जवळ आल्याने थंडी वाढली आहे.  






या भागात पावसाची शक्यता
देशभर थंडीचा कडाका वाढत असतानाच काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे.  तर दक्षिण छत्तीसगड, विदर्भाचा काही भाग आणि आग्नेय मध्य प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेशातील उर्वरित भाग आणि झारखंड, अंतर्गत ओडिसा आणि उत्तर तेलंगणाच्या वेगळ्या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  





हवामान विभागातने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 16 जानेवारीपर्यंत जम्मू आणि काश्मीरसह लडाखमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे, तर जम्मू आणि काश्मीरमधील काही ठिकाणी पावसासह ढगाळ वातावरण असेल. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये गेल्या 24 तासांत ढगाळ वातावरण होते तर काही भागांमध्ये पाऊस पडला आहे. 


या भागात वाढली थंडी
श्रीनगरमध्ये किमान तापमान 0.2 सेल्सिअस झाले आहे. तर पहलगाम मध्ये मायनस 2.6, गुलमर्गमध्ये मायनस 10.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. लडाखच्या द्रास शहरात मायनस 8.8, लेहमध्ये मायनस 7.3 आणि कारगिलमध्ये मायनस 7.0 तापमानाची नोंद झाली आहे. जम्मू शहरात रात्रीचे किमान तापमान 9.7, कटरा 7.6, बटोटे मायनस 0.8, बनिहाल मायनस 1.8 आणि भदेरवाह मायनस 0.1 सेल्सिअस तापमान झाले आहे. त्यामुळे या भागात थंडीचा चांगलाच कडाका वाढला आहे. 
महत्वाच्या बातम्या