एक्स्प्लोर
सिल्वासात बोट उलटल्यानं मुंबईतील ५ जणांचा बुडून मृत्यू

सिल्वासा: दादरा नगर-हवेली मधील सिल्वासा येथील मधुबन धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. सिल्वासाच्या दुधनी रिसॉर्टची खाजगी बोट मधुबन धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पलटली. यावेळी बोटीत 30 पर्यटक होते. हे सर्वजण मुंबईचे राहणारे होते. ज्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. दरम्यान, अग्निशमनच्या जवानांना स्थानिकांच्या मदतीनं १९ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं आहे. वाचवण्यात आलेल्या सर्व १९ जणांना सिल्वासामधील विनोबा भावे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर अद्यापही सहा जण बेपत्ता असून सध्या त्यांचा शोध सुरु आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावं: बिपीन शाह वय - 60 वर्ष पन्नाबेन शाह वय – 55 वर्ष सुनिता कोठारी वय – 54 वर्ष पल्लवी शाह वय – 65 वर्ष विना कमल भोला वय - 54 वर्ष
Before You Go
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके




















