एक्स्प्लोर
एकूण 18 विधेयकं मंजूर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज समारोप झाला. लोकसभेत 113.27 टक्के, तर राज्यसभेत 92.43 टक्के कामकाज या अधिवेशनात झालं. या अधिवेशनात एकूण 18 विधेयकं मंजूर करण्यात आली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा म्हणजे 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी हा काळ विरोधकांच्या गदारोळामुळे गाजला. नोटाबंदीनंतरच्या परिस्थितीवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर दोन्हीही सभागृहात चांगलं कामकाज झालं. या अधिवेशनाची वैशिष्ट्यं
- भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच 31 मार्चआधीच बजेट मंजुरीसह सर्व वित्तीय कामकाज पूर्ण झालं.
- मंत्रालयांना जो निधी मिळायला जून उजाडायचा तो 1 एप्रिलपासूनच मिळायला सुरूवात झाली
- जीएसटीसंदर्भातली महत्वाची विधेयकं सर्वसहमतीने मंजूर
- या अधिवेशनात दोन्ही सभागृहात मिळून एकूण 18 विधेयकं मंजूर झाली.
- एनिमी प्रॉपर्टी अर्थात शत्रू संपत्ती विधेयक, मॅटर्निटी बेनिफिट म्हणजे मातृत्व लाभ विधेयक, पेमेंट ऑफ वेजेस म्हणजे वेतन विधेयक ही महत्वाची विधेयकं मंजूर झाली.
- गोंधळामुळे लोकसभेचे 8 तास तर राज्यसभेत 18 तास वाया गेले. मात्र काही दिवस जास्त वेळ बसून या कामाची भरपाई दोन्ही सदनांनी केली.
- जीएसटी लागू झाल्यावर करपद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत. त्यामुळे वस्तूंच्या किमतींवरही प्रभाव पडणार आहे. GST लागू झाल्यावर त्याचा दर 18 टक्के ठेवला जाईल अशी शक्यता आहे.
- डब्बाबंद खाद्यपदार्थ 12 टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतात.
- कपडे, दागिने यांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. यात 12 टक्के कर लावला जाण्याची शक्यता असेल.
- मोबाईल बिल, क्रेडिट कार्डसारख्या सेवाही महाग होतील. कारण जीएसटी एमआरपीवर लावलं जाईल.
- छोट्या कार, एसी, फ्रिज, वॉशिंग मशिन, मायक्रोवेवसारखी उपकरणं स्वस्त होऊ शकतात.
- खाण्यावर लागणारा कर एकच होणार असल्याने त्यातही दर कमी होऊ शकतात.
- मनोरंजन करही जीएसटीमुळे कमी होऊ शकतो.
- उद्योगांनाही 18 टक्के कर भरावा लागणार नाही, तसेच कर भरण्याच्या प्रक्रियेत सुसुत्रता येणार आहे.
GST संदर्भातील चारही विधेयकं लोकसभेत मंजूर
जीएसटीचा मार्ग मोकळा, विधेयकाला राज्यसभेतही मंजुरी
काय आहे GST विधेयक? जीएसटीबद्दल सर्व काही
आणखी वाचा























