एक्स्प्लोर
Advertisement
तूर, मूग, उडीद डाळींवरील निर्यातबंदी उठवली, केंद्र सरकारचा निर्णय
तूरडाळ, उडद आणि मुगडाळवरची निर्यातबंदी उठवण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तूरडाळ, उडद आणि मुगडाळवरची निर्यातबंदी उठवण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
गेल्या दोन वर्षांत डाळींच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. यंदा देशातील डाळींचं उत्पादन जवळपास 200 लाख टनांवर पोहोचलं आहे. मागील काही वर्षात उडदाच्या डाळीचे उत्पादन 7 ते 10 लाख टन होते ते यंदा 18 ते 20 लाख टनांपर्यंत पोहचलं आहे
याप्रमाणेच मूग डाळीचे उत्पादनदेखील 15 लाख टनांवरुन 22 ते 24 लाख टनांवर पोहोचले. त्याच पार्श्वभूमिवर डाळींवरची ही निर्यातबंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळं आता डाळ निर्यात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement