एक्स्प्लोर

SC : सर्वोच्च न्यायालयाकडून टी.एन. शेषन यांचा उल्लेख, म्हणाले- 'असे मुख्य निवडणूक आयुक्त पुन्हा होणे नाहीच'

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने दिवंगत टी एन शेषन यांची आठवण करत अशा भक्कम स्वभावाची व्यक्ती पुन्हा मुख्य निवडणूक आयुक्त व्हावी अशी इच्छा व्यक्त केली

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) म्हटले, देशात अनेक मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) झाले आहेत, पण टी.एन. शेषन (T. N. Seshan) यांच्यासारखे व्यक्तिमत्व क्वचितच घडतात. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले की, संविधानाने मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्तांच्या खांद्यावर अधिकारांचं प्रचंड ओझं दिलेलं आहे, अशावेळी न्यायालयाने दिवंगत टी एन शेषन यांची आठवण करत अशा भक्कम स्वभावाची व्यक्ती पुन्हा मुख्य निवडणूक आयुक्त व्हावी अशी इच्छा व्यक्त केली.

'सीईसी पदासाठी आपल्याला सर्वोत्तम व्यक्ती शोधावी लागेल' - सर्वोच्च न्यायालय
न्यायमूर्ती अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, हृषिकेश राय आणि सी टी रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, 'देशात अनेक मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) झाले आहेत आणि टीएन शेषन क्वचितच घडतात. असे आम्हाला वाटते. या दोन निवडणूक आयुक्त, एक मुख्य निवडणूक आयुक्त अशा तीन व्यक्तींच्या खांद्यावर राज्यघटनेने प्रचंड अधिकार दिले आहेत. सीईसी पदासाठी आपल्याला सर्वोत्तम व्यक्ती शोधावी लागेल. प्रश्न हा आहे की या पदासाठी आपण सर्वोत्तम व्यक्तीची निवड कशी करायची आणि नेमणूक कशी करायची? असा प्रश्न न्यायालयाला पडला आहे.

18 वर्षांत 14 मुख्य निवडणूक आयुक्त बदलले

2004 पासून एकही मुख्य निवडणूक आयुक्त आपला 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकलेला नाही. हा मुद्दा न्यायालयाने आपल्या टिप्पणीत अधोरेखित केला. न्यायालयाने म्हटले आहे की, "2004 पासून कोणत्याही सीईसीने सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही आणि यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात सहा सीईसी आणि एनडीए सरकारच्या आठ वर्षांत आठ सीईसी होते."

टीएन शेषनचा उल्लेख का करण्यात आला?

न्यायालयाने म्हटले, टी.एन. शेषन हे तामिळनाडू केडरचे 1955 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी होते. टी.एन. शेषन यांनी 27 मार्च 1989 ते 23 डिसेंबर 1989 पर्यंत भारताचे 18 वे कॅबिनेट सचिव म्हणून काम केले. 12 डिसेंबर 1990 ते 11 डिसेंबर 1996 पर्यंत ते भारताचे  मुख्य निवडणूक आयुक्त झाले आणि 11 डिसेंबर 1996 पर्यंत या पदावर राहिले. मुख्य निवडणूक आयुक्त या नात्याने टी. एन. शेषन यांच्या घटनात्मक जबाबदाऱ्यांमुळे निवडणूक आयोगाला नवी ओळख दिली. दरम्यान, बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. सीईसी म्हणून त्यांचा कडकपणा हे उदाहरण ठरले. बूथ कॅप्चरिंगसाठी बिहार कुप्रसिद्ध होता. शेषन यांनी निवडणुकीत केंद्रीय सैन्य तैनात केले. त्यावेळी शेषन यांनी बूथ कॅप्चरिंग आणि हिंसाचार रोखण्यात यश मिळवले. टी एन शेषन यांच्यामुळे देशातील जनतेला, निवडणुका कोण चालवतात? निवडणुकीचे नियम काय आहेत/ हे कळले.

CEC आणि EC च्या निवडीसाठी कॉलेजियम सारख्या प्रणालीचा विरोध

कोर्टाने केंद्रातर्फे उपस्थित असलेले अॅटर्नी जनरल आर वेंकटरामानी यांना सांगितले की, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आयोगाच्या प्रक्रियेचे पालन करतो, जेणेकरून एक सक्षम व्यक्ती, मजबूत चारित्र्याची व्यक्ती सीईसी म्हणून नियुक्त केली जाईल. वेंकटरामानी म्हणाले की, सर्वोत्कृष्ट व्यक्तीची नियुक्ती करण्यास कोणाचाही आक्षेप नाही, पण ती कशी करता येईल हा प्रश्न आहे. 23 ऑक्टोबर 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने CEC आणि EC च्या निवडीसाठी कॉलेजियम सारखी प्रणाली मागणारी जनहित याचिका पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवली होती. 17 नोव्हेंबर रोजी, केंद्राने CEC आणि EC च्या निवडीसाठी या याचिकांना जोरदार विरोध केला आणि म्हटले की, असा कोणताही प्रयत्न म्हणजे घटनादुरुस्ती आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget