TMC MP Mahua Moitra : तृणमुल काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या 50 वर्षीय खासदार महुआ मोईत्रा थेट जर्मनीत गुपचूप विवाहबंधनात; 65 वर्षीय पती पिनाकी मिश्रा आहेत तरी कोण?
Mahua Moitra : महुआ मोईत्रा राजकीय आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहेत. महुआ यांचे यापूर्वी डॅनिश फायनान्सर लार्स ब्रॉर्सनशी संबंध होते, परंतु त्यांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही.

TMC MP Mahua Moitra weds BJD MP Pinaki Mishra : तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या खासदार महुआ मोइत्रा दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकल्या आहेत. बिजू जनता दलाचे नेते आणि खासदार पिनाकी मिश्रा यांच्याशी त्यांनी जर्मनीत विवाह केला. दरम्यान, दोघांकडून अद्याप लग्नाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. महुआ आणि पिनाकी यांनी जर्मनीमध्ये लग्न केल्याचा दावा आहे. दोघांचा एक फोटोही समोर आला आहे. 'द टेलिग्राफ' मधील वृत्तानुसार, महुआ आणि पिनाकी यांनी जर्मनीमध्ये शांतपणे लग्न केले. या प्रकरणावर तृणमूल काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. महुआ मोईत्रा राजकीय आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहेत. महुआ यांचे यापूर्वी डॅनिश फायनान्सर लार्स ब्रॉर्सनशी संबंध होते, परंतु त्यांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला.
खासदार म्हणून महुआ मोईत्रांचा दुसरा कार्यकाळ
खासदार म्हणून महुआ मोइत्रा यांचा दुसरा कार्यकाळ सुरू आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पश्चिम बंगालमधील कृष्णा नगर मतदारसंघातून निवडणूक लढवली. महुआ यांनी ही निवडणूक जिंकली. भाजप उमेदवार कल्याण चौबे यांचा पराभव केला. महुआ दुसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडून आल्या. यावेळी त्यांनी भाजपच्या उमेदवार अमृता रॉय यांचा पराभव केला.
'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणात महुआवर गंभीर आरोप
महुआ मोइत्रा यांचा पहिला कार्यकाळ बराच वादग्रस्त होता. पैशांच्या बदल्यात प्रश्न विचारल्याचा त्यांच्यावर आरोप होता. महुआ 'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणात गंभीरपणे अडकल्या होत्या. त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते, जरी महुआने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. महुआ यांच्यावर संसदेचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड तिच्या हिरानंदानीसोबत शेअर केल्याचाही आरोप होता.
पिनाकीचे वैयक्तिक आयुष्य कसे होते?
बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा पुरीचे खासदार आहेत. लोकसभेच्या आकडेवारीनुसार, पिनाकी यांचे पहिले लग्न संगीता मिश्रा यांच्याशी झाले होते. पिनाकी आणि संगीताचे लग्न 16 जानेवारी 1984 रोजी झाले. दोघांनाही दोन मुले आहेत, परंतु आता पिनाकी यांनी महुआंसोबत विवाह केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























