Tirumala Tirupati Devasthan : देशातील प्रसिद्ध देवस्थान तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या दानपेटीत बुधवारी (16 फेब्रुवारी) 84 कोटी रूपये जमा झाले आहेत. अनेक भाविक तिरूपतीचे दर्शन घेण्यासाठी तिरुमला तिरूपती देवस्थानाला भेट देतात. यावेळी अनेक जण दान देखील करतात. देवस्थानाची श्री वेंकटेश्वर प्राणदान ट्रस्ट देणगी योजना ही उदयस्थान सेवेशी जोडला गेली आहे. या योजनेचा बुधवारी पाहिला दिवस होता. मंदिराच्या इतिहासात आत्तापर्यंत एका दिवसात 84 कोटी रूपये कधीच जमा झाले नव्हते. 


तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष वाय व्ही सुब्बा रेड्डी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, सुमारे 70 देणगीदारांनी 84 कोटी दान केले. मंदिर संस्थेने प्रत्येक देणगीदाराला विशेषाधिकार म्हणून एक उदयस्थान सेवा तिकीट मोफत दिले. तिरुमला तिरुपती देवस्थानने अंदाजे 230 कोटींच्या खर्चात श्री पद्मावती बालरोग मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलच्या स्थापनेसाठी निधी जमा करण्यासाठी ही नवीन योजना सुरू केली आहे. 


एकूण 531 उदयस्थान सेवा तिकिटे देणगीदारांसाठी ठेवण्यात आली आहेत. सुमारे 28 देणगीदार भक्तांनी आणि कंपन्यांनी प्रत्येकी 1.5 कोटी देणगी दिली. त्यांना शुक्रवारसाठी 28 उदयस्थान सेवा तिकिटे देण्यात आली आहेत. तर 42 देणगीदारांनी प्रत्येकी 1 कोटी देणगी दिली. या देणगीदारांना 42 उदयस्थान सेवा तिकिटे देण्यात आली आहेत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha