PIB Fact Check : देशातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारने (Central Government) भारतात डिजिटल इंडिया मिशनवर (Digital India Mission) लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याशिवाय केंद्र सरकारने अनेक नव्या योजनाही (Government Scheme) अंमलात आणल्या आहेत. ज्याद्वारे सरकार गरीब आणि गरजू लोकांना आर्थिक मदत करते. अशातच सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक मेसेज जोरात व्हायरल होत आहे, त्यामध्ये असा दावा करण्यात आलाय की सरकारकडून तरुणांना प्रति महिना 25 हजार रुपये आणि नोकरी दिली जाईल. हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पाहूयात यामागील नेमकं काय सत्य आहे....
डिजिटल इंडियाअंतर्गत सरकारकडून अनेक योजना चालवल्या जात आहेत. ज्यामध्ये सरकारकडून तरुणांना रोजगार देण्यात येत आहे. सोशल मीडियावर नोकरी देणारा मेसेज व्हायरल होत आहे, याचे केंद्र सरकारच्या PIB ने फॅक्ट चेक केलं आहे.
व्हायर होणाऱ्या मेसेजमध्ये काय दावा केलाय?
670 रुपये दिल्यानंतर केंद्र सरकारच्या डिजिटल इंडियाच्या योजनेअंतर्गत टॉवर लावण्यात येईल. 25 हजार प्रतिमहिना मिळाले, तसेच नोकरीही देण्यात येईल.
PIB ने काय म्हटले -
PIB Fact Check ने आपल्या अधिकृत ट्विटरवर ट्विट करत व्हायरल होणारा मेसेज फेक असल्याचे सांगितले आहे. डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत कोणताही टॉवर लावण्यात येत नाही. यासारख्या व्हायरल मेसेजपासून सावध राहा...
व्हायरल मेसेजपासून सावध राहा –
पीआयबीने व्हायरल होणाऱ्या मेसेजचे फॅक्ट चेक केल्यानंतर बोगस असल्याचे सांगितले आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फेक मेसेजपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अशा प्रकारचे मेसेज फॉरवर्ड करु नका, असेही आवाहन करण्यात आलेय. अशा व्हायरल मेसेजमुळे आपली वयक्तिक माहिती आणि पैसेही गमावू शकता. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेजची पडताळणी केल्याशिवाय विश्वास ठेवू नका...
कसे होते फॅक्ट चेक?
अशाप्रकारचा मेसेज आल्यानंतर तुम्हीही पीआयबीद्वारे फॅक्ट चेक करुन सत्य शोधू शकता. त्यासाठी पीआयबीची अधिकृत वेबसाईटला https://factcheck.pib.gov.in/ भेट द्या... त्याशिवाय व्हॉट्सअप क्रमांक +918799711259 अथवा pibfactcheck@gmail.com यावर व्हिडीओ पाठवा.