Jahangirpuri Violence: दिल्लीतील (Delhi) जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीच्या मिरवणुकीनंतर पुन्हा एकदा दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. आता जहांगीरपुरी येथे गुन्हे शाखेच्या पथकावर दगडफेक करण्यात आली असून त्यात सतेंद्र खारी नावाचे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हिंसाचारग्रस्त जहांगीरपुरी भागात रॅपिड अॅक्शन फोर्स आणि पोलिस तैनात करण्यात आले आहेत.


आज जहांगीरपुरी प्रकरणाच्या तपासासाठी आलेल्या गुन्हे शाखेच्या पथकावर दगडफेक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी झालेल्या घटनेनंतर व्हिडीओमध्ये दिसणारा संशयित सोनू चिकना याला पकडण्यासाठी पथक तेथे पोहोचले असता, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. सोनूला पकडण्यासाठी पथक रस्त्यावर पोहोचताच एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून दगडफेक सुरू झाली होती.


दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही किरकोळ घटना होती. कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. जहांगीरपुरीच्या सी-ब्लॉकमध्ये दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी घटनास्थळी गेले होते, त्यावेळी त्यांच्यावर दगडफेक झाली. घटनास्थळी पोलीस आणि आरएएफ तैनात आहेत. जहांगीरपुरी हिंसाचारावर पोलीस अधिकारी म्हणाले की, शनिवारच्या घटनेशी संबंधित आरोपीच्या नातेवाईकांनी ही दगडफेक केली, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. दरम्यान, शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक केल्याप्रकरणी आतापर्यंत 21 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.    


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha