BJP J P Nadda : देशातील अनेक राज्यांतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देशवासियांना पत्र लिहिले आहे. आपल्या पत्रात त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला असून देशातील सर्वात जुन्या पक्षावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जेपी नड्डा यांनी काँग्रेसच्या काळात झालेल्या दंगलींची आठवण करून दिली आहे.


महाराष्ट्रात दोन कॅबिनेट मंत्री तुरुंगात आहेत. यावर काँग्रेस गप्प का?


जेपी नड्डा यांनी लिहिले की, राजस्थानच्या करौली येथील हिंसाचारावर काँग्रेस शांत का आहे? माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते की, जेव्हा मोठे झाड पडते तेव्हा पृथ्वी हादरते. काँग्रेसच्या काळात झालेल्या दंगलींची आठवण त्यांनी करून दिली. बंगाल आणि केरळचा उल्लेख करत जेपी नड्डा म्हणाले की, तिथे भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. महाराष्ट्रात दोन कॅबिनेट मंत्री तुरुंगात आहेत. यावर काँग्रेस गप्प का? जेपी नड्डा यांनी पत्रात लिहिले आहे की, महाराष्ट्रातील दोन कॅबिनेट मंत्र्यांना भ्रष्टाचार, खंडणी आणि असामाजिक घटकांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. हे काळजी करण्यासारखे काही आहे का? गेल्या आठ वर्षांत देशाच्या राजकारणात आमूलाग्र बदल झाला आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली देश सबका साथ, सबका विकास, सबका विश्वासवर पुढे जात आहे. मी विरोधी पक्षांना आवाहन करतो की विकासाचे राजकारण करा.


 






व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्यांचे डोळे उघडले
जेपी नड्डा यांनी पत्रात लिहिले आहे की, व्होट बँकेच्या राजकारणासाठी अनेक दशकांपासून समाजकंटकांशी तडजोडी केल्या जात आहेत. पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्यांचे डोळे उघडले आहेत. त्यांनी लिहिले की, भारतातील तरुणांना विकास हवा आहे, विनाश नाही. एवढी दशके देशावर सत्ता गाजवणारे पक्ष आता इतिहासाच्या सीमारेषेत का मर्यादित आहेत, याचे विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे.


नड्डा यांचे जनतेला आवाहन


जेपी नड्डा यांनी लोकांना 2047 मध्ये भारतासाठी पुढे विचार करून योजना करण्याचे आवाहन केले. त्यांनी लिहिले की, 2047 मध्ये जेव्हा आपण स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करू, तेव्हा देश कसा असेल. जेपी नड्डा यांनी राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत देशातील तरुणांच्या सक्रिय योगदानाची मागणी केली आणि ते म्हणाले की, भारतातील तरुणांना अडथळे नसून संधी हवी आहेत.