एक्स्प्लोर

'या' केसमुळे न्या. लळित अयोध्या प्रकरणातून स्वत:हून बाजूला झाले!

सुप्रीम कोर्टात बऱ्याच वर्षानंतर अयोध्या प्रकरणातल्या अंतिम सुनावणीसाठीचा मुहूर्त काढला जाणार होता, मात्र आज कोर्टात झालेल्या नाटयमय घडामोडीनंतर हे प्रकरण 29 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : वेळ ठरली होती, ठिकाण ठरलं होतं, सुनावणी कुणापुढे होणार हे ही ठरलं होतं...आता केवळ अंतिम सुनावणीला नेमकी कधीपासून सुरुवात होणार हेच ऐकायचं बाकी होतं. पण देशातला सर्वात संवेदनशील असा अयोध्या प्रकरणाचा खटला सुप्रीम कोर्टात आज नाट्यमय घडामोडींनी पुन्हा लांबणीवर पडला. याला निमित्त ठरलं या खंडपीठातले एक न्यायमूर्ती उदय लळित यांच्या इतिहासातल्या एका केसचं. साडेदहा वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली. रामलल्ला विराजमानकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे, तर सुन्नी वक्फ बोर्डाकडून राजीव धवन बाजू मांडणार होते. बाकी कुणी काही बोलायच्या आतच, राजीव धवन यांनी या खंडपीठातले एक न्यायमूर्ती उदय लळित हे बाबरी मशीद प्रकरणात सुप्रीम कोर्टाची अवमानना केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांच्यासाठी वकील म्हणून हजर राहिल्याची आठवण करुन दिली. मी फक्त हे खंडपीठाच्या निदर्शनास आणू इच्छितो, या पीठाने सुनावणी करण्यास आमचा आक्षेप नाही, असंही त्यांनी म्हटलं. अयोध्या प्रकरण : न्या. लळित यांची माघार, सुनावणी 29 जानेवारीपर्यंत टळली राजीव धवन यांनी असं म्हटल्यानंतर थोडा वेळ पाचही न्यायमूर्तींमध्ये काही कुजबूज झाली आणि नंतर सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी सांगितलं की, न्यायमूर्ती उदय लळित स्वत: या खंडपीठातून बाजूला होऊ इच्छितात. 29 जानेवारीला आता नवं खंडपीठ अयोध्या प्रकरणातल्या अंतिम सुनावणीची तारीख ठरवेल. एखाद्या महत्त्वाच्या खटल्यातून न्यायमूर्तींनी अशा पद्धतीने स्वत:ला ऐनवेळी बाजूला करण्याची ही घटना तशी दुर्मिळच. पण कुठल्या केसमुळे हा वाद झाला यावर एक नजर टाकूया.. बाबरी मशीद विध्वंसाशी संबंधित असलम भुरे केसमध्ये लळित हे यूपीचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांच्या बाजूने केस लढले होते. असलम भुरे हा बाबरी मशीद विध्वंसस प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेणारा पहिला याचिकाकर्ता होता. कल्याणसिंह यांनी या प्रकरणात कोर्टाची अवमानना केल्याचा आरोप होता. कल्याणसिंह यांना राष्ट्रीय एकता कमिटीच्या मीटिंगमध्ये दिलेल्या वचनांशी एकनिष्ठ राहावं असा आदेश सुप्रीम कोर्टाने बाबरीच्या विध्वंसाआधीच दिलेला होता. जी अनेक वचनं या मीटिंगमध्ये त्यांनी दिलेली होती, त्यातलं एक होतं की बाबरी मशीदीचं संपूर्ण रक्षण करणं ही उत्तर प्रदेश सरकारची जबाबदारी असेल. अयोध्या प्रकरण : सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठात तीन मराठमोळे न्यायमूर्ती 1995 मध्ये कल्याणसिंह यांच्या वतीने उदय लळित हे सुप्रीम कोर्टात वकील म्हणून हजर राहिले होते. अयोध्या प्रकरणाचा फैसला जे खंडपीठ देणार होतं, त्याची निवड ज्येष्ठतेच्या क्रमानुसार झाली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या रमण्णा, न्या. लळित आणि न्या. धनंजय चंद्रचूड. पाच न्यायमूर्तींच्या या खंडपीठात न्या. बोबडे आणि न्या. चंद्रचूड यांच्याप्रमाणे लळित हेदेखील मराठी होते. कोण आहेत उदय लळित? - उदय लळित हे मूळचे सोलापूरचे - 9 नोव्हेंबर 1957 चा जन्म - जून 1983 पासून वकिलीला सुरुवात - सुरुवातीची काही वर्षे मुंबई उच्च न्यायालयात वकिली - त्यानंतर 1986 पासून दिल्लीत - 2004 ला सुप्रीम कोर्टात सिनियर अँडव्होकेट - 2G प्रकरणात सीबीआयकडून विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झालेली सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार - 13 ऑगस्ट 2014 रोजी सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती -  8 नोव्हेंबर 2022 ला निवृत्त होत आहेत. अयोध्या वाद : 3 मिनिटांचं कामकाज, सुनावणी 3 महिन्यांसाठी टळली सप्टेंबर 2010 मध्ये हायकोर्टाचा निकाल आला, त्यानंतर नऊ वर्षे सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणीची तारीख निश्चित होऊ शकली नाही. आज त्याची शक्यता वाटत असताना सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील राजीव धवन यांच्या एका टिपण्णीमुळे हे प्रकरण आणखी लांबणीवर पडलं. सुनावणीसाठी आक्षेप नाही असं म्हणत असतानाच जाणीवपूर्वक न्यायमूर्तींना त्यांच्या इतिहासाची जाणीव करुन देऊन धवन यांनी आपला हेतू मात्र साधला. निवडणुकांपर्यंत या केसचा निकाल लागू नये या त्यांच्या प्रयत्नांचाच हा भाग म्हणायला हवा. सुप्रीम कोर्टात बऱ्याच वर्षानंतर अयोध्या प्रकरणातल्या अंतिम सुनावणीसाठीचा मुहूर्त काढला जाणार होता, मात्र आज कोर्टात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर हे प्रकरण 29 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आलं आहे. आता नवं खंडपीठ 29 जानेवारीला अंतिम सुनावणीसाठीची तारीख ठरवेल.

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Embed widget