Telangana Dowery News : वधूने माहेरच्या मंडळींकडून हुंडा आणला नाही, म्हणून नवऱ्या मुलाकडच्या मंडळींनी लग्न (Arrange Marriage) मोडल्याचा घटना घडल्याचे अनेकदा पहिले असेल. मात्र तेलंगणात (Telangana) या उलट प्रकार घडला आहे. या घटनेत वधू  मुलीने वराकडे हुंडा देण्याची मागणी केली होती. मात्र ऐन लग्नाच्या दिवशी वर पक्षाकडून ही मागणी पूर्ण करण्यात न आल्याने वाढून चक्क लग्नच मोडल्याचा प्रकार घडला आहे. 


एकीकडे आजकाल हुंडा प्रथा (Dowery) बंदच झाल्याचे सांगितले जाते. मात्र वर्तमानपत्रातून रोजच हुंडाबळीच्या घटना ऐकायला, वाचायला मिळतात. हुंडा न दिल्याने विवाहितेचा छळ, हुंडा न दिल्याने विवाहितेवर अत्याचार, अशा अनेक घटना समोर येत असतात. मात्र तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम येथील अस्वराओपेट गावात याउलट प्रकार घडला आहे. येथील परिसरात राहणाऱ्या आदिवासी बांधवांमध्ये उलट हुंडा नावाची प्रथा असल्याचे सांगितले जाते.  येथील आदिवासी मुलीने प्रथेनुसार वर पक्षाकडे 2 लाखांपेक्षा जास्त रुपयांची मागणी केली होती. मात्र ऐनवेळी हुंडा देण्यास नकार दिल्याने मुलीने लग्नच मोडल्याचे उघडकीस आले. 


तेलंगणातील एका आदिवासी जमातीत (Tribel Community) वधू नव्हे, तर वराला हुंडा द्यावा लागतो. मुलीने मागितलेला 2 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा हुंडा देण्यास मुलाने नकार दिला. मात्र काही दिवसांनी तो राजी झाला. तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम येथील अस्वराओपेट गावातील असलेल्या मुलीचे गुरुवारी घाटकेसर येथे लग्न होणार होते. विवाहाचा दिवस उजाडला. मंडपात वरपक्षाचे सारे लोक हजर झाले. मुलगा आपली भावी पत्नी कधी विवाहस्थळी कधी येते, याची वाट पाहात होता. पण बराच वेळ झाला ती व वधू पक्षाचे लोक आलेच नाहीत. तेव्हा वराच्या कुटुंबाने हॉटेलमध्ये धाव घेतली, जिथे तिच्या कुटुंबाने ठेवले होते. यावेळी वधू मागते आहे, तेवढा हुंडा देण्याची होऊ घातलेल्या नवऱ्याची ऐपत नाही, असे कारण देऊन मुलीने हा विवाह मोडला.


दरम्यान यानंतर वराच्या कुटुंबाला धक्का बसला. वराने लग्नाचा 'मंडप' सोडत त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. वधूच्या कुटुंबीयांना बोलावून या प्रकरणावर चर्चा करण्यात आली. दोन्ही कुटुंबांनी आपापसात हे प्रकरण सोडवले आणि लग्न उरकण्यात आले. कोणतीही तक्रार नोंदवली गेली नाही आणि कोणीही गुन्हा दाखल केला नाही. असे दिसून आले की वधूला लग्नात रस नाही, म्हणून तिने अधिक हुंड्याची मागणी केली. मुळात त्या मुलीला आपल्याला सांगून आलेल्या या मुलाशी विवाह करायचा नव्हता. घरच्या मंडळींनी खूपच आग्रह केल्याने अखेर ती या मुलाशी बोलायला राजी झाली. तिने जाणुनबुजून या मुलाकडे 2 लाख रुपयांहून अधिक रकमेचा हुंडा मागितल्याचे समजते. 


तोडगा काढण्यासाठी पोलिसांचा हस्तक्षेप


दरम्यान मुलीला संबंधित मुलाशी लग्न करायचे नव्हते. म्हणून जाणूनबुजून अधिकची रक्कम वर पक्षाला सांगितली होती. इतकी मोठी रक्कम ऐकून हा मुलगा काढता पाय घेईल, असे मुलीला वाटले होते. पण बरोबर उलटे घडले. मागितलेला हुंडा देण्यास तो मुलगा तयार झाला. त्यानंतर मुलीसमोर मोठे संकट उभे राहिले. तिने हुंड्याचे कारण सांगून हा विवाह मोडला. ती विवाह मंडपात न आल्याने संतप्त झालेल्या वरपक्षाच्या मंडळींनी पोलिसांत धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी मुलीला बोलावून घेतले. दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये चर्चा घडवून आणली. त्यानंतर परस्पर संमतीने हा विवाह मोडण्याचे ठरविले. अशा रितीने या प्रकरणावर तोडगा निघाल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही.