Telangana Election Result 2023 : केसीआर पुन्हा मुख्यमंत्री होणार? काँग्रेस सत्तापालट करणार? मतमोजणीला सुरुवात; भाजपची स्थिती नेमकी काय? तेलंगणाच्या निवडणूक निकालाचे सर्व अपडेट
Telangana Assembly Election Results 2023: महाराष्ट्राला लागूनच असलेल्या तेलंगाणाचंही भविष्य अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे. तेलंगणामध्ये चंद्रशेखर रावांना धक्का बसणार का हे काही वेळातच स्पष्ट होईल.
Telangana Election Results 2023 : कामरेड्डी मतदारसंघातून तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी हे केसीआर यांच्यापेक्षा 1768 मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत 9 फेऱ्यांची मोजणी झाली असून, एकूण 19 फेऱ्यांची मोजणी बाकी आहे.
Telangana Election Results 2023 Reactions Live : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चार राज्यांच्या निकालाबाबत बोलताना सांगितले की,"आम्ही तेलंगणात आघाडी घेतली आहे. छत्तीसगडमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आमच्या अंदाजानुसार आम्ही तेलंगणा आणि छत्तीसगड जिंकत आहोत. आम्हाला वाटले होते की तिथे मध्य प्रदेशातही स्पर्धा होईल. मात्र, अंतिम निकाल अद्याप आलेला नाही, त्यामुळे वाट पहावी लागेल."
Telangana Election Results 2023 Reactions Live : तेलंगणा निवडणुकीच्या निकालांवर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले,"राज्यातील जनतेने परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे. प्रगतीसाठी बदल झाला पाहिजे. रेवंत रेड्डी हे टीम लीडर आहेत. आमचा पक्ष मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेईल. ही निवडणूक सामूहिक नेतृत्वाखाली होणार आहे. हा निकाल आहे. मी केसीआर किंवा केटीआरवर कोणतेही भाष्य करू इच्छित नाही, तेलंगणातील जनतेने त्यांना उत्तर दिले आहे.
Telangana Election Results 2023 : तेलंगणात काँग्रेस आघाडीवर आहे. केसीआर दुसऱ्या क्रमांकावर तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार काँग्रेस आघाडीवर आहे.
काँग्रेस-65
BRS-39
भाजप-10
इतर-5
Telangana Election Results 2023 : गोशामहल मतदारसंघातील भाजप नेते टी. राजा सिंह म्हणाले, "मी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत पुढे होतो, सध्या चौथ्या फेरीची मतमोजणी सुरू आहे."
Telangana Election Results 2023 : तेलंगणा कामारेड्डी मुख्यमंत्री केसीआर पिछाडीवर आहेत. तर कोडांगल रेवंथरेड्डी आघाडीवर आहेत.
Telangana Election Results 2023 : तेसंगणात काँग्रेस 64 जागांवर आघाडीवर आहे. BRS 42 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 9 जागांवर आघाडीवर आहे, तर अपक्ष उमेदवार 4 जागांवर आघाडीवर आहेत.
Telangana Election Results 2023 Reactions Live : बीआरएस नेते विष्णू रेड्डी म्हणाले,"निवडणुकीपूर्वी आम्ही सांगितले होते की बीआरएस 88+ जागा जिंकत आहे. आम्हाला अजूनही विश्वास आहे की आम्ही पुन्हा सत्तेत येत आहोत."
Telangana Election Results 2023 : तेलंगणात कलांनुसार काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. काँग्रेस 66 जागांवर आघाडीवर आहे. तर बीआरएस 45 जागांवर आहेत.
Telangana Election Results 2023 : काँग्रेस 65 जागांवर आघाडीवर आहे तर बीआरएस 50 जागांवर आघाडीवर आहे. भाजप आणि अपक्ष उमेदवार 4 जागांवर आघाडीवर आहेत.
Telangana Election Results 2023 : तेलंगणामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार ज्या हॉटेलमध्ये आहे तिथून चार बसेस विविध मतदारसंघात रवाना झाले आहेत. विजयी होणाऱ्या काँग्रेस आमदारांना बसेसमधून सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या काँग्रेसच्या सूचना, सूत्रांची माहिती आहे. एकूण चार खासगी बसेस हॉटेलमधून निघाल्या आहेत.
Telangana Election Results 2023 : तेलंगणात पुन्हा बीआरएसची मुसंडी. तेलंगणात काँग्रेस-बीआरएसमध्ये फक्त 10 जागांचा फरक आहे.
Telangana Election Results 2023 : तेलंगणात काँग्रेस कलांनुसार पुन्हा बहुमताच्या खाली आलं आहे. तेलंगणामध्ये काँग्रेस बहुमतावरुन मागे आहे.
Telangana Election Results 2023 : तेलंगणात काँग्रेस-बीआरएसची पुन्हा चुरस पाहायला मिळत आहे. काँग्रेस 59 जागांवर तर बीआरएस 49 जागांवर आहे.
Telangana Election Results 2023 : काँग्रेस 63 जागांवर तर बीआरएस 46 जागांवर पुढे आहे. तर भाजप केवळ 6 जागांवर आघाडीवर आहे. 5 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.
Telangana Election 2023 : तेलंगणा करीमनगरमधून बंडी संजयकुमार आघाडीवर आहेत.
Telangana Election 2023 : तेलंगणा ज्युबिली हिल्समधून मो. अजहरुद्दीन पिछाडीवर आहेत.
Telangana Election Results 2023 : काँग्रेस 67 जागांवर तर बीआरएस 39 जागांवर पुढे आहे. तर भाजप केवळ 6 जागांवर आघाडीवर आहे. 7 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.
Telangana Election Results 2023 : तेलंगणात केसीआर दोन्ही जागांवर पिछाडीवर आहेत.
Telangana Election Results 2023 : गोशामहल जागेवर भाजप नेते टी. राजा सिंह आघाडीवर आहेत. ते या जागेवरून विद्यमान आमदार आहेत.
हैदराबाद : राज्यात सलग तिसर्यांदा सत्ता मिळण्याची आशा असलेल्या भारत राष्ट्र समितीवर काँग्रेसने तेलंगणात प्राथमिक कलांमध्ये आघाडी घेतली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी तेलंगणा निवडणुकीचे निकाल महत्त्वाचे असतील. कर्नाटकमधील विजयानंतर येथील विजयामुळे दक्षिणेत त्यांचे अस्तित्व आणखी मजबूत होईल. पहिल्या तासात काँग्रेसने 60 जागांवर आघाडी घेतली आहे. बीआरएस 33 जागांवर आघाडीवर आहे. एमआयएम 6 जागांवर आघाडीवर आहे.
Telangana Election Results 2023 : तेलंगणात काँग्रेसने प्राथमिक कलांमध्ये बहुमताचा 60 जागांचा आकडा गाठला; बीआरएस-एमआयएमची पिछाडी
हैदराबाद : राज्यात सलग तिसर्यांदा सत्ता मिळण्याची आशा असलेल्या भारत राष्ट्र समितीवर काँग्रेसने तेलंगणात प्राथमिक कलांमध्ये आघाडी घेतली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी तेलंगणा निवडणुकीचे निकाल महत्त्वाचे असतील. कर्नाटकमधील विजयानंतर येथील विजयामुळे दक्षिणेत त्यांचे अस्तित्व आणखी मजबूत होईल. पहिल्या तासात काँग्रेसने 60 जागांवर आघाडी घेतली आहे. बीआरएस 33 जागांवर आघाडीवर आहे. एमआयएम 6 जागांवर आघाडीवर आहे.
Telangana Election Results 2023 : तेलंगणात काँग्रेसने प्राथमिक कलांमध्ये बहुमताचा 60 जागांचा आकडा गाठला; बीआरएस-एमआयएमची पिछाडी
Telangana Election Results 2023 : बहुमताचा आकडा पार करत काँग्रेस 60 जागांवर आघाडीवर आहे. बीआरएस 33 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 3 जागांवर पुढे आहे. 6 जागांवर अपक्ष उमेदवार पुढे आहेत.
Telangana Election Result 2023 : तेलंगणात काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे.
Telangana Election Results 2023 Live Updates : तेलंगणासाठी मतमोजणी सुरु झाली आहे. पोस्टल बॅलेटमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. पोस्टल बॅलेटमध्ये सत्ताधारी बीआरएस 13 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 17, भाजप 4 आणि MIM एक जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यात 71.34 टक्के मतदान झाले. भारत राष्ट्र समिती (BRS), काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष (BJP) हे प्रमुख दावेदार आहेत. 221 महिला आणि एका ट्रान्सजेंडरसह तब्बल 2,290 उमेदवार रिंगणात आहेत.
Telangana Election Results 2023 Live Updates : तेलंगणाच्या रणांगणात तीन चेहऱ्यांची सर्वाधिक चर्चा; कोणाला गुलाल लागणार अन् कोणाचा चेहरा पडणार?
Telangana congress : तेलंगणामध्ये काँग्रेसने बहुमताचा 60 जागांचा आकडा गाठला, पहिल्या कलांनुसार एकूण 119 जागांपैकी काँग्रेस बहुमताच्या दिशेने, सत्ताधारी बीआरएसची पिछेहाट
Telangana Election Results 2023 Reactions Live : बीआरएस एमएलसी के. कविता म्हणाल्या, “आम्ही (BRS) सत्तेत येणार आहोत याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे".
Telangana Election Result 2023 : बीआरएसचे केटीआर (मुख्यमंत्री केसीआर यांचा मुलगा) सिरिल्ला जागेवरून आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे अधारुद्दीन जुबली हिल्स जागेवरून आघाडीवर आहेत.
Telangana Election Results 2023 :
कामरेड्डी मतदारसंघातून केसीआर आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी त्यांच्या मागे आहेत.
Telangana Election 2023 : तेलंगणात भाजपचं खातं उघडलं गेलं आहे. तेलंगणात काँग्रेस 27 आणि बीआरएस 25 जागांवर आघाडीवर आहे.
Telangana Election 2023 : तेलंगणात काँग्रेस 27, बीआरएस 25 जागांवर आघाडीवर आहे.
Telangana Election Results 2023 Reactions Live : मतमोजणीदरम्यान तेलंगणा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले की, "आम्ही 70 जागा जिंकत आहोत. असेच काहीसे मतदानातही सांगण्यात आले होते."
Telangana Election Results 2023 : काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर आहे. तर बीआरएसदेखील 12 जागांवर आघाडीवर आहे. भाजप एकाही जागेवर आघाडीवर नाही.
Telangana Election Results 2023 Live Updates : यावेळी तेलंगणात भारत राष्ट्र समिती (BRS), काँग्रेस की भाजप, कोणाचे सरकार स्थापन होणार? या प्रश्नाचे उत्तर आज काही तासांमध्ये मिळेल. पहिला कल सकाळी 9 वाजता येईल. 30 नोव्हेंबर रोजी राज्यातील 119 विधानसभा जागांवर 70.66 टक्के मतदान झाले होते. 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा हे प्रमाण 2.76 टक्क्यांनी कमी आहे. तेव्हा 73.37 टक्के मतदान झाले होते. पोल ऑफ पोलमध्ये म्हणजे सर्व एक्झिट पोलच्या सरासरी आकडेवारीतही काँग्रेस बहुमताच्या पलीकडे आहे. यामध्ये काँग्रेसला 65, बीआरएसला 43, भाजपला 7 आणि इतरांना 4 जागा मिळण्याची शक्यता आहे.
हैदराबाद : तेलंगणात (Telangana Election Results 2023 Live Updates) भारत राष्ट्र समिती (BRS), काँग्रेस (Congress) की भाजप (BJP) कोणाचे सरकार स्थापन होणार? या प्रश्नाचे उत्तर आज काही तासांमध्ये मिळेल. पहिला कल सकाळी 9 वाजता येईल. 30 नोव्हेंबर रोजी राज्यातील 119 विधानसभा जागांवर 70.66 टक्के मतदान झाले होते. 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा हे प्रमाण 2.76 टक्क्यांनी कमी आहे. तेव्हा 73.37 टक्के मतदान झाले होते.
Telangana Election Results 2023 Live Updates : कर्नाटकनंतर तेलंगणामध्ये काँग्रेज बाजी मारणार की सीएम केसीआर खूर्ची राखणार? दक्षिण भारतात भाजपची प्रतिष्ठा पणाला
Telangana Election Results 2023 Live : काँग्रेस तीन जागांवर आघाडीवर आहे. बीआरएस 2 जागांवर आघाडीवर आहे.
Telangana Election Results 2023 Reactions Live : तेलंगणा निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. बीआरएस दोन जागांवर आघाडीवर आहे.
Telangana Election Result 2023 : मध्य प्रदेशात काँग्रेस 5, भाजप 5 जागांवर आघाडीवर आहे.
Telangana Election Result 2023 : मध्य प्रदेशात काँग्रेस 5, भाजप 5 जागी आघाडीवर
Election Result 2023 Reactions Live : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी झूम बैठकीत तेलंगणा काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधला. या बैठकीनंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना कर्नाटकात पाठवण्यात आले. तेलंगणात काँग्रेसने कर्नाटकातील 49 आमदारांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
Telangana Election Results 2023 Reactions Live : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हैदराबादला पोहोचले आहेत. ते म्हणाले,"बीआरएसच्या काही लोकांनी आमच्या आमदारांशी संपर्क साधला आहे. आम्ही त्यांच्या सुरक्षेची काळजी घेत आहोत. आमच्या एकाही आमदाराचा पराभव होणार नाही".
Telangana Election 2023 : केसीआर पुन्हा मुख्यमंत्री होणार? काँग्रेस सत्तापालट करणार?
Telangana Assembly Election 2023 Results Live : कोण होणार तेंलगणाचा मुख्यमंत्री?
Khammam Election Result 2023 LIVE : Khammam तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी सुरू होईल. Khammam विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीशी संबंधित सर्व बातम्यांसाठी एबीपी माझासोबत राहा. तेलंगणातील 119 जागांसाठी मतदान झाले आणि आज (3 डिसेंबर 2023) मतमोजणी होणार आहे.
Palair Election Result 2023 LIVE : Palair तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी सुरू होईल. Palair विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीशी संबंधित सर्व बातम्यांसाठी एबीपी माझासोबत राहा. तेलंगणातील 119 जागांसाठी मतदान झाले आणि आज (3 डिसेंबर 2023) मतमोजणी होणार आहे.
Madhira Election Result 2023 LIVE : तेलंगणा विधानसभा मतदारसंघ Madhiraचे सर्व अपडेस्ट जाणून घ्या. तेलंगणा निवडणुकीची मतमोजणी लवकरच सुरू होणार आहे. मधीरा विधानसभा मतदारसंघातून कोण पुढे आणि कोण मागे हे लवकरच समोर येईल.
Wyra Election Result 2023 LIVE : Wyra तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी सुरू होणार आहे. Wyra विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीशी संबंधित सर्व बातम्यांसाठी एबीपी माझासोबत राहा.
Sathupalli Election Result 2023 LIVE : Sathupalli विधानसभा मतदारसंघातून कोण जिंकणार आणि तेलंगणाचा मुख्यमंत्री कोण होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत.
Kothagudem Election Result 2023 LIVE : तेलंगणा निवडणूक 2023 ची मतमोजणी लवकरच सुरू होणार आहे. तेलंगणातील 119 जागांसाठी मतदान झाले आणि आज (3 डिसेंबर 2023) मतमोजणी होणार आहे. कोठगुडम तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी सुरू होणार आहे.
Aswaraopeta Election Result 2023 LIVE : तेलंगणातील असवरोपेटा विधानसभा निवडणुक निकालाच्या मतमोजनीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.
Bahdrachalam Election Result 2023 LIVE : बद्राचलम तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजनी सुरू होणार आहे. तेलंगणातील 119 जागांसाठी मतदान झाले आणि आज (3 डिसेंबर 2023) मतमोजणी होणार आहे.
पार्श्वभूमी
मुंबई : तेलंगणा विधानसभा निवडणूक 2023 साठी (Telangana Vidhan Sabha Election 2023) आज 30 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांच्या नेतृत्त्वातील भारत राष्ट्र समिती(Bharat Rashtra Samiti Telangana) सरकार सत्ता टिकवणार की काँग्रेस (Congress) बाजी मारणार हे काही वेळात स्पष्ट होईल. तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागा आहेत. बहुमतासाठी 60 जागांची गरज आहे.
महाराष्ट्राला लागूनच असलेल्या तेलंगाणाचंही भविष्य अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे. 2014 साली स्थापन झालेल्या तेलंगाणामध्ये स्थापनेपासून भारत राष्ट्र समितीची (Bharat Rashtra Samiti) सत्ता आहे. आणि त्याच पक्षाचे के. चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री आहेत. शेतकऱ्यांसाठीच्या योजना, उद्योगांना दिलेली सूट आणि मध्यम वर्गांमध्ये आकर्षक असा चेहरा असलेल्या केसीआर यांना पुन्हा सत्ता मिळेल असा विश्वास जाहीर केलं आहे. मात्र, त्यांना कडवं आव्हान दिलंय, काँग्रेसच्या रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांनी. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा फायदा कर्नाटकात झाला. तसाच फायदा तेलंगाणातही होईल असा विश्वास काँग्रेसला आहे. शिवाय, केसीआर यांच्याविरोधातली नाराजीही काँग्रेसच्या फायद्याची ठरु शकते. असं असलं तरी ओवैसींची एमआयएम आणि भाजपलाही विसरुन चालणार नाही. तुलनेनं दोन्ही पक्षांचं इथं अस्तित्व फार नाहीय. मात्र, यावेळी स्थिती बदलली आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -