एक्स्प्लोर
मोदींनी चहा विकलेल्या दुकानाला पर्यटनस्थळ घोषित करणार!
अहमदाबाद : गुजरातमधील वडनगरच्या ज्या दुकानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चहा विकला होता, ते दुकान आता पर्यटनस्थळ घोषित केलं जाणार आहे. केंद्र सरकारने या ठिकाणाला नवं रुप देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. वडनगर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर हे दुकान आहे.
गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर हे मोदींचं जन्मगाव आहे. या गावाला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे. संस्कृतीक आणि पर्यटन मंत्रालय आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतंच या जागेचं सर्वेक्षणही केलं आहे.
संस्कृतीक मंत्री महेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाने या जागेची पाहणी केली. शिवाय या जागेला आधुनिक रुप देऊन याचं मूळ सौंदर्य सुरक्षित करण्याची घोषणा केली.
वडनगर हे मोदींच्या जन्मस्थळासोबतच ऐतिहासिक केंद्रही आहे. वडनगरमध्ये प्रसिद्ध शर्मिष्ठा तलाव आणि विहिर आहे. तर भारतीय पुरातत्व विभागाला खोदकाम करताना बौद्ध मठाचे अवशेषही सापडले होते. ज्याचं खोदकाम अजून सुरुच आहे, अशी माहिती महेश शर्मा यांनी गांधीनगरमध्ये बोलताना दिली.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी या ठिकाणाचा अनेकदा उल्लेख केला होता. आपण वडनगर रेल्वे स्टेशनवर वडिलांसोबत चहा विकत होतो, असं त्यांनी यापूर्वीही अनेकदा सांगितलेलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement