एक्स्प्लोर

सायरस मिस्त्रींना 'टाटा', चेअरमनपदी पुन्हा रतन टाटा !

मुंबई: सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी पुन्हा रतन टाटा चेअरमनपदाची धुरा सांभाळणार आहेत. चार महिन्यांसाठी रतन टाटा चेअरमनपदी असतील. त्यानंतर सर्च पॅनेल नव्या चेअरमनची निवड करेल. सायरस मिस्त्री यांनी चार वर्षापूर्वीच म्हणजे 2012 मध्ये टाटा समूहाच्या चेअरमनपदाची धुरा सांभाळली होती. चारवर्षापूर्वी रतन टाटांनी सायरस मिस्त्री ही जबाबदारी सांभाळतील असा विश्वास व्यक्त केला होता. सायरस मिस्त्री त्यावेळी शापूरजी पालोनजी ग्रुपचे प्रबंध निर्देशक होते. सायरस मिस्त्री २००६ पासून टाटा ग्रृपच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये आहेत. सायरस मिस्त्री यांचं शिक्षण लंडनमध्ये झालंय. इंपेरियल कॉलेजमध्ये त्यांनी सिव्हिल इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलंय. सायरस मिस्त्री यांनी त्यानंतर लंडन बिझनेस स्कूलमधून मॅनेजमेंटमधून शिक्षण घेतलं. एक लाखांत चार चाकी गाडीचे स्वप्न ते जॅग्वारसारख्या बड्या कंपनीतील भागीदारी, अशा तमाम विक्रमांना नावावर करणारे रतन टाटा चार वर्षांपूर्वी टाटा समूहाच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा चार महिन्यांसाठी ते चेअरमनपदी विराजमान होतील. रतन टाटा यांची टाटा समूहातील कारकीर्द कमालीची यशस्वी ठरली ----------------- *२८ डिसेंबर १९३७ ला भारतात जन्माला आलेले रतन टाटा यांनी १९७१ साली अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली. *रतन टाटा हे २१ वर्ष टाटा समुहाचे अध्यक्ष होते. *१९७१ साली टाटा समूहाची उलाढाल होती १००० कोटी पण टाटांच्या काळात २०१२ पर्यंत हाच आकडा ४ लाख ७५ हजार ७२१ कोटींवर पोहोचला *२००० साली 'टाटा टी'ने इंग्लंडमधल्या टेटली हा प्रसिद्ध ब्रँड ताब्यात घेतला. *२००७ साली ब्राझीलच्या बलाढ्य कंपनीला मागे टाकत टाटा स्टीलने कोरस कंपनी ताब्यात घेतली. *त्यांनंतर वर्षभरातच फोर्ड कंपनीची जँग्वार लँडरोव्हर ही टाटांच्या ताब्यात आली *मात्र पश्चिम बंगालमधल्या सिंगूरमध्ये टाटांचा महत्वाकांक्षी नॅनो प्रकल्प आकार घेऊ शकला नाही. *अखेर रतन टाटांनी गुजरतचा प्रस्ताव स्वीकारला आणि टाटांची नॅनो भारतीयांच्या हातात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget