Aadhar Card : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या आधारकार्डसोबत छेडछाड, बिहारमधून गुजरात पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या
Aadhar Card : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांच्या आधारकार्डसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
PM Modi CM Yogi Adityanath Aadhar Card : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांच्या आधारकार्डसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. बिहारमधील मुजफ्फरपूर येथे एका तरुणाने पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या आधारकार्डसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सदातपुर गावातून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव अर्पण दुबे उर्फ मदन कुमार असे आहे. पण याप्रकरणामुळे आधारच्या डेटाबेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
अहमदाबाद येथून सायबर पोलिसांचं पथक बिहारला आले होते. बिहार पोलिस आणि अहमदाबाद सायबर पोलिसांच्या पथकाने एकत्रपणे कामगिरी करत अर्पण दुबे याला बेड्या ठोकल्या. बुधवारी त्या व्यक्तीला अहमदाबादला नेहण्यात आलेय. अहमदाबाद पोलीस पुढील तपास करत आहेत. आरोपीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, अर्पण निर्दोष आहे. त्यांच्या मुलाविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तो अभ्यासातही चांगला आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेला तरुण अर्पण दुबे हा अर्थशास्त्र विषयात पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. अर्पण याने कॉम्पुटर डिप्लोमाचा कोर्सही केलेला आहे.
अर्पण दुबेच्या विरोधात अहमदाबादमध्ये गुन्हा दाखल
बिहारमधील कांटी पोलिस स्टेशनचे एसएचओ संजय कुमार यांनी सांगितले की, गुजरातच्या अहमदाबाद सायबर सेलच्या टीमने अर्पण दुबेला अटक केली आहे. पीएम मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आधार क्रमांकाशी छेडछाड केल्याची तक्रार त्यांच्यावर आली होती. अहमदाबादच्या सायबर पोलिस ठाण्यातच एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अहमदाबाद सायबर पोलिसांनी अर्पणची चौकशी करून त्याला अहमदाबादला नेले.
कशी झाली कारवाई ?
अहमदाबाद सायबर सेलच्या पथकाने कांटी पोलिस स्टेशनच्या मदतीने तरुणाला अटक केली. सदातपुरा गावात मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून अर्पण दुबे याला अटक केली आहे. त्याच्या मोबाईलची झडती घेतली असता यासंबंधीचे (पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या आधारकार्डशी छेडछाड) पुरावे सापडले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या सायबर सेल पोलिस ठाण्यात पाच दिवसांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आली होती. अहमदाबाद पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.