एक्स्प्लोर

तामिळनाडू विधानसभेत पलानीसामींसमोर बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान

चेन्नई : तामिळनाडू विधानसभेमध्ये नवनिर्वाचित मुख्यमंत्री पलानीसामी यांच्या दृष्टीने शनिवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. पलानीसामी यांच्या पुढ्यात बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान आहे. मात्र मुख्यमंत्रिपदावरुन नुकतेच पायउतार झालेले पन्नीरसेल्वम त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरु शकतात. शशिकला तुरुंगात गेल्यामुळे पलानीसामी आणि पन्नीरसेल्वम यांच्यात सत्तासंघर्ष रंगणार आहे. तामिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठराव संमत करण्याच्या अवघ्या एक दिवस आधी पलानीसामी गटाला मोठा धक्का बसला. आमदार आणि राज्याचे माजी पोलिस महासंचालक नटराज यांनी मुख्यमंत्र्यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचा इशारा दिला आहे. नटराज यांच्या पवित्र्यानंतर 234 सदस्य असलेल्या तामिळनाडू विधानसभेत पलानीसामींच्या कथित समर्थक आमदारांची संख्या घटून 123 वर गेली आहे. तामिळनाडू विधानसभेत एआयएडीएमकेचे 134 आमदार आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी 118 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. आर नटराज यांनी विरोधात जाण्याची भूमिका घेतल्यानंतरही पलानीसामींनी आपल्याकडे बहुमतापेक्षा 5 आमदार जास्त (123) असल्याचा दावा केला आहे. नव्या सरकारला सदनात बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र एआयएडीएमकेच्या महासचिव शशिकला यांचे निकटवर्तीय असणाऱ्या पलानीसामी यांनी दोनच दिवसात बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. शशिकलांचं समर्थ करणारे आमदार चेन्नईपासून 80 किलोमीटर दूर कुवाथुरच्या रिसॉर्टमध्ये राहत आहेत. आमदारांना एकत्र ठेवण्याचं आव्हान पलानीसामींसमोर आहे. पलानीसामींना बहुमत सिद्ध करु न देण्यासाठी पन्नीरसेल्वम यांच्या गटाचेही जोरदार प्रयत्न सुरु आहेत. डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी पलानीसामी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाविरोधात मतदार करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसनेही विरोधात जाण्याचा निर्णय घेतला आहे. पन्नीरसेल्वम यांच्याकडे 11 आमदारांचा पाठिंबा आहे. मात्र पलानीसामी गटातील आणखी काही आमदारांना आपल्याकडे खेचण्यात पन्नीरसेल्वम यांना यश आलं तर ते अल्पमतातील सरकार स्थापन करु शकतात.

संबंधित बातम्या :

पलानीसामी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रं, दोन महिन्यातील तिसरे मुख्यमंत्री

जयललितांच्या समाधीवर शशिकलांनी रागाने हात आपटले, कारण...

आत्मसमर्पणाआधी शशिकला अम्मांच्या समाधी स्थळावर

पनीरसेल्वम यांची हकालपट्टी,पलनीसामी विधीमंडळ नेतेपदी

शशिकलांना मोठा धक्का, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी 4 वर्षांचा तुरुंगवास

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
Sanjay Raut on Amit Shah: 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Embed widget