CDS Chopper Crash : भारतीय हवाईदलाचे सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) हे असलेल्या भारतीय हवाईदलाच्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ झाला आहे. या अपघातात रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात केवळ ग्रुप कॅप्टन वरुण सिंग (Varun Singh) वाचले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
नेमकं काय घडलं?
कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. यामध्ये भारताचे सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या पत्नीसह 12 लष्करी जवानांचा समावेश होता. दरम्यान यामध्ये रावत पती-पत्नीसह 11 जवान मृत्यूमुखी पडले असून केवळ ग्रुप कॅप्टन वरुण सिंग वाचले आहेत. दरम्यान याबाबतची माहिती मिळाली मिळताच गृहमंत्री अमित शाह यांनीही वरुण लवकर ठिक व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे.
कोण आहेत वरुण सिंग?
भारतीय हवाईदलातील विंग कमांडर असणारे वरुण सिंग यांना याआधी शौर्य चक्र देऊनही सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी भारतीय हवाईदलासाठी केलेल्या सेवेसाठी त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे. तसंच याआधी तेजस विमानाच्या फ्लाईट सिस्टम फेलियर झाली असताना यशस्वीरित्या विमानचं लँडिग करत दुर्घटना होण्यापासून रोखलं होतं.
संबंधित बातम्या :
- Bipin Rawat : शक्तिमान अधिकाऱ्याला देश मुकला...पण देशाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
- CDS Bipin Rawat Helicopter crash : दोन इंजिन, अतिशय सुरक्षित, तरीही हेलिकॉप्टर कसं कोसळलं, नेमकं कारण काय?
- Madhulika Rawat : आयुष्यभर खंबीर पाठिंबा, शेवटच्या क्षणापर्यंत साथ, हेलिकॉप्टर दुर्घटनेत मधुलिका रावत यांचंही निधन!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha