नवी दिल्ली :

  तामिळनाडूमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांना घेऊन जाणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे एकूण 14 जण होते, त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआयने त्यांच्या ट्वीटमध्ये दिली आहे. आता या सर्व प्रकरणावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे उद्या लोकसभेत निवेदन देणार असल्याचं सूत्रानी सांगितलं आहे.


कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचा समावेश आहे. 


केंद्रीय मंत्रिमंडळाची आज यावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनीही बिपीन रावत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. 


कोण आहेत सीडीएस जनरल बिपीन रावत



  • 2016 साली बिपीन रावत हे लष्करप्रमुख झाले. लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग 31 डिसेंबर 2016ला सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या जागी रावत यांची नेमणूक करण्यात आली होती. 

  • बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांची 1 सप्टेंबर 2016 रोजीच सेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.

  • बिपीन रावत यांचे वडीलही नि. लेफ्टनंट जनरल एल एस रावत हे सेनेच्या उपप्रमुखपदावर निवृत्त झाले होते.

  • रावत हे डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झालेले 'बेस्ट कॅडेट' ठरले. 

  • रावत यांना 'स्वार्ड ऑफ ऑनर' या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं.

  • सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल सारख्या अनेक पुरस्कारांनी रावत यांना गौरवण्यात आलं आहे.


IAF Mi-17V5 अत्यंत सुरक्षित हेलिकॉप्टर 
दोन इंजिन असलेलं IAF Mi-17V5 हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजलं जातं. पण तरीही हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने, त्याबाबतच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.  हे हेलिकॉप्टर रशियन बनावटीचं आहे. सैन्य दल आणि व्हीआयपींसाठी हे हेलिकॉप्टर मुख्यत्वे वापरलं जातं. 


संबंधित बातम्या :