Bipin Rawat Helicopter Crash : भारतीय हवाई दलासाठी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे चार उच्च अधिकारी होते. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. 


IAF Mi-17V5 अत्यंत सुरक्षित हेलिकॉप्टर 
दोन इंजिन असलेलं IAF Mi-17V5 हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजलं जातं. पण तरीही हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने, त्याबाबतच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.  हे हेलिकॉप्टर रशियन बनावटीचं आहे. सैन्य दल आणि व्हीआयपींसाठी हे हेलिकॉप्टर मुख्यत्वे वापरलं जातं. 


काय आहेत MI 17 हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये? 



  • ट्रांसपोर्ट कम सशस्त्र हल्ला करण्याची क्षमता

  • निर्मिती- रशिया

  • पहिले उड्डाण- 1975 (अगोदर एमआय-8 एमटी होते नंतर 1981 मध्ये सुधारणा करून एमआय 17 तयार करण्यात आले).

  • जगातील 60 देशांमध्ये वापर

  • चालक- (3) दोन पायलट, एक इंजिनिअर

  • क्षमता- 24 सैनिक. 12 स्ट्रेचर, 4 हजार किलो सामग्री वहन क्षमता

  • वेग- 280 किमी प्रति तास

  • शस्त्र क्षमता- बॉम्ब, रॉकेट आणि गनपॉडसह सहा हार्डपॉईंट, डिस्पोजेबल स्टोरेज 1500 किलो


गेल्या दोन महिन्यात तिसरा अपघात
MI 17 हॅलिकॉप्टर क्रॅश होण्याची गेल्या दोन महिन्यातली ही तिसरी घटना आहे. या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये MI 17 हॅलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. त्यामध्ये दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. 


त्यानंतर 18 नोव्हेंबरला अरुणाचल प्रदेश क्रॅश लँण्डिंग प्रकरण घडलं. त्यामध्ये सुदैवाने सर्वजण सुखरुप होते. MI 17 हेलिकॉप्टरच्या अपघाताची तिसरी घटना ही 8 डिसेंबरला घडली असून तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये MI 17 हॅलिकॉप्टर क्रॅश झालं.  महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे चार उच्च अधिकारी होते. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.


संबंधित बातम्या :