TamilNaduChopperCrash : हेलिकॉप्टर दुर्घटना तपासातील सर्व बाजू तपासू : हवाई दल प्रमुख व्ही. आर. चौधरी
"तामिळनाडू येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर उड्डाणासाठी व्हीव्हीआयपी ( VVIP) प्रोटोकॉलची समिक्षा करण्यात येईल." अशी माहिती हवाई दलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी दिली आहे.
CDS Bipin Rawat : नवी दिल्ली : तामिळनाडू येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत (TamilNaduChopperCrash) भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह लष्करी अधिकाऱ्यांचे निधन झाले. देशाच्या तिन्ही दलातील लष्कर प्रमुखाचा असा अपघाती मृत्यू होणे ही देशासाठी गंभीर बाब आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी करावी अशी मागणी होत होती. या पार्श्वभूमीर हवाई दलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी (IAF Chief VR Chaudhari) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
"तामिळनाडू येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर उड्डाणासाठी व्हीव्हीआयपी ( VVIP) प्रोटोकॉलची समिक्षा करण्यात येईल. चौकशीच्या निष्कर्षांवर आधारित सर्व प्रक्रियेची समिक्षा केली जाईल. आम्ही सतत पाकिस्तान आणि चीनकडून येणाऱ्या धोक्यांचे मूल्यांकन करत आहोत. शिवाय त्याबद्दल आम्ही चांगल्या प्रकारे जागरूक आहोत." अशी माहिती व्ही. आर. चौधरी यांनी दिली आहे.
After #TamilNaduChopperCrash the VVIP protocols to fly will be revised and reviewed. All these procedures will be reviewed based on the findings of the enquiry. We are continuously evaluating threats from Pakistan and China and are very well aware of it: IAF Chief VR Chaudhari pic.twitter.com/p8Nb9fjOnD
— ANI (@ANI) December 18, 2021
व्ही. आर. चौधरी यांनी आज पत्रकारांसोबत संवाद साधून हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "हेलिकॉप्टर तपासात सर्व बाजू आणि सर्व घटकांवर आधारित तपास करत आहोत. या तपासात कोणतीही बाजू वगळण्यात येणार नाही. शिवाय आतापर्यंत झालेल्या तपासात काय माहिती मिळाली आहे ती लगेच जाहीर करणे योग्य होणार नाही. या दुर्घटनेतील प्रत्येक गोष्ट तपासणे गरजेचे आहे. अशी माहिती व्ही. आर. चौधरी यांनी दिली.
काय होती दुर्घटना?
लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन हवाई दलाचं IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होतं. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्य दलातील बडे अधिकारी होते. जवळपास 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील सर्वांचाच दुर्देवी मृत्यू झाला.
सीडीएस बिपीन रावत यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमागची नेमकी कारणं काय असा प्रश्न संपूर्ण देशाला पडलाय. आणि या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता वाढली आहे. कारण कुन्नूरमध्ये ज्या टेकडीवर हेलिकॉप्टर कोसळलं होतं, त्या ठिकाणी ब्लॅक बॉक्स सापडला आहे. दुर्घटनेसंदर्भातील तांत्रिक माहिती या ब्लॅक बॉक्समुळं समजू शकते.
महत्वाच्या बातम्या
- Bipin Rawat Death : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या निधनानं शोक; कोण असतील देशाचे पुढचे सीडीएस?
- Bipin Rawat Helicopter Crash : बिपीन रावत यांनी केले होते सर्जिकल स्ट्राईक आणि म्यानमार ऑपरेशनचे नेतृत्व