एक्स्प्लोर

T49 Tunnel: लांबी 12.75 किमी, आव्हानांचा डोंगर! भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा लवकरच पूर्ण

T49 Tunnel :  उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (Udhampur-Srinagar-Baramulla Rail Link) प्रकल्पाद्वारे जम्मू आणि काश्मीरला उर्वरित भारताशी जोडण्याचे हे कठीण मिशन हाती घेतले आहे.

T49 Tunnel : जगातील सर्वात मोठे रेल्वे जाळे भारतीय रेल्वेचे आहे. आता भारतीय रेल्वेनं एक नवी मोहीम हाती घेतलीय. ती आहे जम्मू आणि काश्मीर (Jammu & Kashmir) ला उर्वरित भारताशी जोडण्याची. त्यासाठी हिमालयाच्या खडकाळ पर्वतीय प्रदेशात दळण वळण सुलभ होण्यासाठी बोगदे आणि अनेक पुल बांधत आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (Udhampur-Srinagar-Baramulla Rail Link) प्रकल्पाद्वारे जम्मू आणि काश्मीरला उर्वरित भारताशी जोडण्याचे हे कठीण मिशन हाती घेतले आहे.

यूएसबीआरएल (USBRL) प्रकल्पासाठी अनेक बोगदे आणि पुलांवर दशकभराहून अधिक काळ काम करत असलेली अफकॉन्स (Afcons) लवकरच भारतीय रेल्वेसाठी सर्वात लांब रेल्वे बोगदा पूर्ण करत आहे. T49 नावाचा हा बोगदा 12.75 किमी लांब असून जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील संबर आणि अर्पिंचला स्टेशन्सना जोडतो. अफकॉन्सने एकूण बोगद्यापैकी 7.32 किमी बोगदा बांधला आहे जो संपूर्ण बोगद्याच्या सुमारे साठ टक्के आहे.  मुख्य बोगद्याच्या व्यतिरिक्त, अफकॉन्सने दोन अडिट (adit), वीस क्रॉस पॅसेजेस (cross passsages), दोन पूल आणि स्टेशन यार्ड देखील या प्रकल्पामध्ये बांधले आहे.

गुरुत्वाकर्षणावर मात 

बोगदा बांधणे हे हिमालयातील खरे आव्हान आहे. उतारप्रवण  (downward gradient) सह बोगदा बांधताना जटिलतेची पातळी आणखीच कठीण होते. बोगद्याचा ग्रेडियंट (gradient) हा उतार किंवा रेषा किती तिरकस आहे याचे मोजमाप आहे. एकूणच अभियांत्रिकी आणि बांधकामात ती मोठी भूमिका बजावते. अफकॉन्सने उत्तर पोर्टल (अर्पिंचाला गाव) पासून 7.32 किमी बोगदा बांधला आहे जो 1,600 मीटर उंचीवर आहे.

उत्खननातील आव्हाने

गुरुत्वाकर्षणाच्या आव्हानाव्यतिरिक्त, या प्रदेशात, आणि विशेषतः, इतका लांब बोगदा बांधण्याच्या संदर्भात, इतर काही आव्हाने होती. वेंटिलेशन सिस्टीमची (ventilation system) व्यवस्था करणे, पाण्याचा निचरा करणे आणि प्रतिकूल भूवैज्ञानिक आणि हवामानाच्या परिस्थितीमध्ये काम करणे हे धोके होते. बोगद्याच्या एका विभागामध्ये, 450 मीटर-लांब असलेल्या भागावर 800-850 मीटर इतका जाडीच्या भार होता.  “त्यामुळे उत्खननादरम्यान खडक फुटणे, तुंबणे आणि फुटणे अशा घटना होत होत्या. ते सोडवण्यासाठी प्रेशर रिलीफ होल (pressure relief hole) पाडले आणि तत्काळ आधार देण्यासाठी स्वेलेक्स बोल्ट (swellex bolts) बसवले, असल्याचं अफकॉन्सचे प्रकल्प व्यवस्थापक चंद्रशेखर दीक्षित  म्हणाले.

मुख्य बोगद्याच्या आणखी दोन किलोमीटरच्या पट्ट्यात जमिनीच्या विशिष्ट स्थितीमुळे उच्च विकृतीचा (deformation) धोका होता. “आम्ही जवळजवळ 1-1.5 मीटर ने व्यास कमी करण्याच्या कठीण आव्हानाचा सामना करत होतो. यामुळे प्रकल्पाच्या प्रगतीवर लक्षणीय परिणाम होईल.  हे टाळण्यासाठी, आम्ही ते टप्पे ओळखले आणि ते पुनर्स्थापित केले," असेही दीक्षित यांनी सांगितले.

•T49 बोगद्याची वैशिष्टे-  
- T49 हा देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे
- हा बोगदा 12.75 किमी लांब आहे आणि तो पीर-पंजाल बोगद्याला (11.2 किमी) मागे टाकतो. 
- हा बोगदा उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) प्रकल्पाचा भाग आहे. 
-15 फेब्रुवारी 2022 रोजी बोगद्याचे काम (tunnel breakthrough) पूर्ण झाले. 
- अफकॉन्सने एकूण बोगद्यापैकी 7.32 किमी (जवळपास 60%) बांधला आहे
- अफकॉन्सने नॉर्थ पोर्टलवरून बोगदा बांधला आहे जो 1,600 मीटर उंचीवर आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Fact Check: भाजप नेत्यांकडून आपच्या अवध ओझांचा सिसोदियांना 'घाबरट' म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल, दावा ठरला खोटा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
आपचे नेते अवध ओझांनी मनीष सिसोदियांना घाबरट म्हटल्याच्या दावा खोटा, एडिटेड व्हिडीओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 03 PM 17 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सSaif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Fact Check: भाजप नेत्यांकडून आपच्या अवध ओझांचा सिसोदियांना 'घाबरट' म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल, दावा ठरला खोटा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
आपचे नेते अवध ओझांनी मनीष सिसोदियांना घाबरट म्हटल्याच्या दावा खोटा, एडिटेड व्हिडीओ व्हायरल
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Embed widget