एक्स्प्लोर
पासपोर्टसंबंधी सुषमा स्वराजांकडून मोठी घोषणा
नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज (23 जून) पासपोर्ट शुल्कात कपात केल्याची घोषणा केली आहे. पासपोर्ट बनवण्यासाठी एकूण शुल्कापैकी आता 10 टक्के कमी पैसे मोजावे लागणार आहेत. पण याचा सर्वांनाच फायदा मिळणार नाही.
8 वर्षाखालील मुलं आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ लोकांना याचा फायदा मिळणार आहे. इतरांना सध्या जे शुल्क आकारलं जातं तेच द्यावं लागणार आहे. यासोबतच सुषमा स्वराज यांनी आणखी एक महत्वाची घोषणा केली. यापुढे पासपोर्ट इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये मिळणार आहे. पण पासपोर्टवरील संबंधित व्यक्तीच माहिती ही इंग्रजीमध्येच असणार आहे.
यासोबतच सुषमा स्वराज यांनी एका स्टॅम्पचंही अनावरण केलं. पासपोर्ट अॅक्ट लागू होऊन 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हा स्टॅम्प जारी करण्यात आला. त्याचवेळी या दोनही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement