सुशिल चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त, राष्ट्रपतींनी केली नियुक्ती
सुशिल चंद्रा (Sushil Chandra ) यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner Of India) म्हणून पदभार घेतला असून त्यांनी सुनिल अरोरा यांची जागा घेतली आहे. सुशिल चंद्रा यांचा कार्यकाल पुढच्या वर्षी मे पर्यंत असेल.

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाला नवीन मुख्य निवडणूक आयुक्त मिळाले असून सुशिल चंद्रा यांनी पदभार स्वीकारला आहे. सुशिल चंद्रा यांनी सुनिल अरोरा यांची जागा घेतली असून सुनिल अरोरा यांचा कार्यकाल संपला आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी सुशिल चंद्रा यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.
President appoints Shri Sushil Chandra as the Chief Election Commissioner in the Election Commission of India https://t.co/wBNPpcYFLF
— Sheyphali Sharan (@SpokespersonECI) April 12, 2021
सुशिल चंद्रा यांचा मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यकाल हा पुढच्या वर्षी मे महिन्यापर्यंत असून त्यांच्या कारकीर्दीत गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका होणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन अतिरिक्त निवडणूक आयुक्त असतात. सुशिल चंद्रा यांनी 2014 साली निवडणूक आयुक्तीची जबाबदारी घेतली होती. निवडणूक आयोगातील सर्वात वरिष्ठ आयुक्ताला मुख्य निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात येते. त्याच आधारावर सुशिल चंद्रा यांची मुख्य निवडणूक आयुक्त पदी निवड झाली आहे. निवडणूक आयुक्त पदी नियुक्ती होण्यापूर्वी सुशिल चंद्रा हे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डचे अध्यक्ष होते.
सुशिल चंद्रा हे 1980 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यांतील अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलंय.
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus Update : कोरोनाच्या प्रादुर्भावात काहीसा दिलासा; देशात 24 तासांत 97 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
- Veera Sathidar | राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कोर्ट' चित्रपटातील अभिनेते वीरा साथीदार यांचं कोरोनामुळे निधन
- India Pakistan War | येत्या पाच वर्षात भारत-पाकिस्तानमध्ये मोठ्या युद्धाची शक्यता; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खात्रीलायक अहवाल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
