एक्स्प्लोर
2011 च्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये 3 पाक जवानांचा शिरच्छेद?
मुंबई : 2011 साली भारतीय सैनिकांनी एलओसी पार करुन सर्जिकल स्ट्राईक केल्याची खबळजनक बातमी 'द हिंदू' या वृत्तपत्रानं दिली आहे. जुलै 2011 मध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या हल्ल्यात 6 भारतीय जवान शहीद झाले होते.
शहीद झालेल्या सहा जवानांपैकी दोघांचे शीर धडावेगळे करुन पाकिस्तानात नेण्यात आलं होतं. पण त्याच कारवाईचा बदला भारतीय सैनिकांनी काही दिवसातच पाकव्याप्त काश्मीरच्या जिंजर भागात धडक कारवाई घेतला.
2011 मधील सर्जिकल स्ट्राईकमध्ये 8 पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात आलं होतं. इतकंच नाही, तर त्यातल्या तीन सैनिकांचे शीर धडावेगळे करुन भारताच्या हद्दीतही आणले होते.
दरम्यान 'द हिंदू' या वृत्तपत्रानं छापलेल्या बातमीला भारतीय लष्कराने किंवा सरकारने अद्याप दुजोरा दिलेला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement