एक्स्प्लोर

सरन्यायाधीश विरुद्ध चार न्यायमूर्ती : ‘सर्वोच्च’ वाद आज सुटणार?

केंद्र सरकारही जरी हे न्यायव्यवस्थेचं अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हणत असलं, तरी काल पंतप्रधान मोदी यांचे प्रधान सचिव नृपेद्र मिश्र अचानक सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या घरी पोहोचले. मात्र दीपक मिश्रा यांची भेट झाली नाही. त्यामुळे ते तसेच परतले. काँग्रेससह अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले.

नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च वादाचा आज तिसरा दिवस आहे. मात्र आज हा वाद सुटण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे चारही न्यायमूर्तींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. खरंतर शनिवारीच चारही मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र न्या. कुरियन जोसेफ, न्या. मदन लोकूर आणि न्या. रंजन गोगोई हे दिल्लीबाहेर होते. आज संध्याकाळपर्यंत तिघेही दिल्लीत परतणार आहेत. त्यामुळे संध्याकाळी सरन्यायाधीश दीपक मिश्रांशी त्यांची चर्चा होऊ शकते. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या चारपैकी दोन न्यायमूर्तींनी काल मौन सोडलं आणि वाद सुटण्याचे संकेत दिले. केरळमध्ये न्या. कुरियन जोसेफ यांनी म्हटले, “आम्ही एक मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावर उपाय नक्की सापडेल. कुठलाही असा मुद्दा नाही, ज्यासाठी बाहेरील मध्यस्थाची गरज भासेल. न्यायव्यवस्थेचं हे अंतर्गत प्रकरण आहे आणि ते सुटेलही. न्यायसंस्थेत सुधारणांची गरज आहे. न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास वाढायला हवा. त्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले होते. आम्हाला आशा आहे की, सुप्रीम कोर्ट प्रशासनात अधिक पारदर्शकता येईल.” केंद्र सरकारही जरी हे न्यायव्यवस्थेचं अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हणत असलं, तरी काल पंतप्रधान मोदी यांचे प्रधान सचिव नृपेद्र मिश्र अचानक सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या घरी पोहोचले. मात्र दीपक मिश्रा यांची भेट झाली नाही. त्यामुळे ते तसेच परतले. काँग्रेससह अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले.  काय आहे प्रकरण? भारताच्या इतिहासात अशी वेळ कधीही आली नाही, जेव्हा न्यायमूर्तींना पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त करावी लागली असेल. सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी (जे.चल्मेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ) यांनी मुख्य न्यायमूर्तींवर गंभीर आरोप केले. न्यायमूर्ती म्हणाले की, “पत्रकार परिषद बोलावताना आम्हाला अजिबात आनंद होत नाही. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून न्यायव्यवस्थेत जे काय सुरु आहे, ते व्यथित करणारं आहे. सुप्रीम कोर्ट प्रशासनाचं कामकाज सुरळीत होत नाही. याबाबत आम्ही सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्रही लिहिलं. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सरन्यायाधीशांना लिहिलेलं पत्र सार्वजनिक करणार आहोत. आम्ही आमचा आत्मा विकला, असं आम्हाला भविष्यात कोणीही बोलू नये. न्यायव्यवस्था टिकली नाही, तर लोकशाही टिकून राहणार नाही.” वरिष्ठ न्यायमूर्ती चलमेश्वर यांनी सांगितलं की, “न्यायालयातील अनियमिततेसंदर्भात आम्ही वारंवार सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींसमोर आपापली मतं मांडली. पण त्यांनी आपलं म्हणणं ऐकून घेतलं नाही.” संबंधित बातम्या : देशात आणीबाणी सदृष्य परिस्थिती : यशवंत सिन्हा सीपीआय खासदार डी. राजांची न्यायमूर्ती चेलमेश्वरांशी भेट देशातील लोकशाही धोक्यात, न्यायमूर्तींच्या प्रकरणावरुन राहुल गांधींचं वक्तव्य या एका केसमुळे न्यायमूर्तींच्या असंतोषाचा कडेलोट झाला सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेनंतर पंतप्रधानांची कायदेमंत्र्यांशी चर्चा सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, खुद्द न्यायमूर्तींची हतबलता सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत? सरकारसमोर झुकू नका, सरकारला झुकवा : कोळसे-पाटील न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे?

महत्त्वाच्या बातम्या

Election Commission : 'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
'कोणी नागरिक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार ECI ला नाही'; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
Gunaratna Sadavarte on Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Rajendra Shinde and Pradeep Purnekar: अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले,
अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले, "होय, मी प्रदीप पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना ओळखतो"
IND vs WI 4th T20 : वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
Nana Patekar Death Tanushree Dutta: 'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
Embed widget