एक्स्प्लोर
आत्महत्या रोखण्यासाठी पंख्यांमध्ये स्प्रिंग-सेन्सर-सायरन !
कोटा (राजस्थान) : स्पर्धा परीक्षांचं माहेरघर मानलं जाणाऱ्या कोटा शहरात पंख्यांना स्प्रिंग, सेन्सर आणि सायरन बसवलं जाणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी देशभरातून अनेक विद्यार्थी कोटामध्ये येऊन हॉस्टेलमध्ये राहतात. अनेकदा स्पर्धा परीक्षेत यश मिळालं नाही, तर नैराश्य येऊन टोकाचं पाऊल उचलतात.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, कोटामध्ये 2014 साली 45 विद्यार्थी, 2015 साली 30 विद्यार्थी आणि 2016 साली 17 विद्यार्थ्यांनी नैराश्येतून टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली.
कोटात झालेल्या सर्वाधिक आत्महत्या या पंख्याला गळफास लावून झालेल्या आहेत. आत्महत्येची आकडेवारी आणि आत्महत्येसाठी पंख्याचा वापर होत असल्याचे पाहून कोटातील हॉस्टेल असोसिएशनने पंख्यांना स्प्रिंग, सायरन आणि सेन्सर लावण्याचा निर्णय घेतला आहे. कोटातील हॉस्टेल असोसिएशनमध्ये सुमारे 500 हॉस्टेल्सची नोंदणी आहे.
पंख्यांना लावण्यात येणारी स्प्रिंग केवळ 20 किलोपर्यंत वजन पेलू शकते. याहून अधिक भार पंख्यावर पडल्यास स्प्रिंग तुटून खाली पडेल, त्याचवेळी सेन्सरमुळे सायरन मोठ्याने वाजू लागेल.
येत्या दोन ते तीन महिन्यात कोटातील हॉस्टेलमधील सर्व पंख्यांमध्ये स्प्रिंग, सेन्सर आणि सायरन बसवले जातील. गुजरातमधील एका कंपनीला याचं कंत्राट देण्यात आले आहे. पंख्यांमध्ये स्प्रिंग, सेन्सर बसवण्यासोबतच सर्व हॉस्टेलमध्ये बायोमेट्रिक अटेन्डन्स सुरु करण्यात येणार आहे. शिवाय, हॉस्टेलच्या इन आणि आऊट अशा दोन्ही गेटवर सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात येतील.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोटातील हॉस्टेल असोसिएशनची ही क्लृप्ती किती प्रभावी ठरते, हे येत्या काळात पाहायला मिळेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement