एक्स्प्लोर
कर्जबुडव्या मल्ल्याला दिल्लीतील न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
मनी लॉन्ड्रीग प्रकरणी कर्जबुडव्या विजय मल्ल्याला दिल्लीतील विशेष न्यायालयाने 27 ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रीग प्रकरणी कर्जबुडव्या विजय मल्ल्याला दिल्लीतील विशेष न्यायालयाने 27 ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने आर्थिक गुन्हेगारी बिल 2018 नुसार न्यायालयात दिलेल्या निवेदनावरुन मल्ल्याला समन्स बजावण्यात आले आहे. त्यानुसार मल्ल्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
विजय मल्ल्याने भारतीय बँकांचं 9 हजार कोटींचं कर्ज थकवलं आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी आर्थिक गुन्हेगारी बिलनुसार मल्याची 12,500 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करायची आहे. कर्ज फेडण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहून आपली बाजू मांडल्याचा दावा विजय मल्ल्याने केला आहे.
'काही राजकीय नेत्यांनी आणि मीडियाने माझ्यावर विनाकारण आरोप केले. मी किंगफिशर एअरलाईन्सला दिलेले 9 हजार कोटींचं कर्ज घेऊन फरार झाल्याचं चित्र उभं केलं गेलं. कर्ज देणाऱ्या काही बँकांनी कारण नसताना मला काळ्या यादीत टाकलं आणि मला कर्जबुडव्या घोषित केलं', असं मल्ल्यानं म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बॉलीवूड
क्रीडा
नाशिक
Advertisement