एक्स्प्लोर

NDA, NA परीक्षेत भाग घेणाऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या

नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) आणि नेव्हल अकॅडमी (एनए) च्या परीक्षांना बसणार्‍या उमेदवारांच्या प्रवासासाठी मध्य रेल्वे पूर्णपणे आरक्षित विशेष गाड्या चालविणार आहे.

मुंबई : राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि नेव्हल अकॅडमी (एनए) परीक्षेत भाग घेणाऱ्या उमेदवारांसाठी 4,5 आणि 6 सप्टेंबर 2020 रोजी मध्य रेल्वे विशेष गाड्या चालवणार आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) आणि नेव्हल अकॅडमी (एनए) च्या परीक्षांना बसणार्‍या उमेदवारांच्या प्रवासासाठी मध्य रेल्वे पूर्णपणे आरक्षित विशेष गाड्या चालविणार आहे.  या दरम्यान प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19  शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे.

अशा असतील विशेष गाड्या

सोलापूर-मुंबई विशेष (2 फेऱ्या) 01254 विशेष सोलापूर येथून दि. ५.९.२०२० रोजी २२.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसर्‍या दिवशी ०६.३५ वाजता पोहोचेल. 01253 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि.६.९.२०२० रोजी २२.४५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०६.५० वाजता सोलापूरला पोहोचेल. *थांबे* : कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादर *संरचनाः* १० शयनयान, ३ द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, ३ द्वितीय श्रेणी.

पुणे-मुंबई विशेष (2 फेऱ्या) 01130 विशेष पुणे येथून दि. ५.९.२०२० रोजी २३.५० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०४.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल. 01129 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि. ६.९.२०२० रोजी २२.५५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०३.१५ वाजता पुण्याला पोहोचेल. *थांबे* : लोणावळा, कल्याण, दादर. *संरचनाः* १५ शयनयान, ९ द्वितीय श्रेणी.

अहमदनगर-मुंबई विशेष (2 फेऱ्या) 01132 विशेष अहमदनगर येथून दि. ५.९.२०२०२ रोजी २१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसर्‍या दिवशी ०५.३५ वाजता पोहोचेल. 01131 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि.६.९.२०२० रोजी २०.३५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी अहमदनगर येथे ०४.४० ​​वाजता पोहोचेल. *थांबे* : मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर *संरचनाः* ११ शयनयान, ३ तृतीय वातानुकूलित, ६ द्वितीय श्रेणी.

नाशिक रोड - मुंबई विशेष (2 फेऱ्या) 01134 स्पेशल नाशिकरोड येथून दि. ५.९.२०२० रोजी २३.४५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०४.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईला पोहोचेल. 01133 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि. ६.९.२०२० रोजी २३.३० ​​वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी नाशिक रोड येथे ०३.१५ वाजता पोहोचेल. *थांबे* : इगतपुरी, कल्याण, दादर *संरचनाः* १६ द्वितीय आसन श्रेणी , ३ वातानुकूलित चेअर कार आणि एक द्वितीय श्रेणी.

भुसावळ - मुंबई विशेष (2 फेऱ्या) 02172 विशेष भुसावळ येथून दि. ५.९.२०२० रोजी २१.१५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०५.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल. 02171 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून ६.९.२०२० रोजी २१.३० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०४.३० वाजता भुसावळ येथे पोहोचेल. *थांबे* : जळगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर *संरचनाः* १८ शयनयान, २ द्वितीय श्रेणी.

मुंबई-सावंतवाडी रोड विशेष (4 फेऱ्या) 01135 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि. ४.९.२०२० आणि ६.९.२०२० रोजी २२.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सावंतवाडी रोड येथे सकाळी ०८.१० वाजता पोहोचेल. 01136 विशेष सावंतवाडी रोड येथून दि. ५.९.२०२० आणि ७.९.२०१० वाजता १२.५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे त्याच दिवशी २३.०० वाजता पोहोचेल. *थांबे* : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ. *संरचनाः* १३ शयनयान, ४ तृतीय वातानुकूलित, ७ द्वितीय श्रेणी.

पुणे-हैदराबाद स्पेशल (2 फेऱ्या) 01155 विशेष पुणे येथून दि. ५.९.२०२० रोजी १४.१५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०४.०० वाजता हैदराबाद येथे पोहोचेल. 01156 विशेष हैदराबाद येथून दि. ६.९.२०२० रोजी २२.४५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १३.१५ वाजता पुणे येथे पोहोचेल. *थांबे* : दौंड, कुर्डूवाडी, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, बिदर, विकाराबाद, लिंगमपल्ली, बेगमपेट *संरचनाः* १० शयनयान, ४ तृतीय वातानुकूलित, ८ द्वितीय श्रेणी.

कोल्हापूर-नागपूर विशेष (2 फेऱ्या)  01137 विशेष कोल्हापूर येथून दि. ५.९.२०१० रोजी सकाळी ०८.०५ वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी ०५.४० वाजता नागपूरला पोहोचेल. 01138 विशेष नागपूर येथून दि. ६.९.२०२० रोजी २०.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १८.३० वाजता कोल्हापूर येथे पोहोचेल. *थांबे* : मिरज, सांगली, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा. *संरचनाः* १८ शयनयान, ६ द्वितीय श्रेणी.

पुणे-नागपूर विशेष (2 फेऱ्या)  02159 विशेष पुणे येथून दि. ५.९.२०२० रोजी १६.१५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०६.१५ वाजता नागपूरला पोहोचेल. 02160 विशेष नागपूर येथून दि. ६.९.२०२० रोजी २०.३० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ११.५५ वाजता पुणे येथे पोहोचेल. *थांबे* : दौंड कॉर्ड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा. *संरचनाः* १८ शयनयान, ६ द्वितीय श्रेणी.

मुंबई-नागपूर विशेष (2 फेऱ्या)  02161 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि.५.९.२०२० रोजी १७.१५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ०६.०० वाजता नागपूरला पोहोचेल. 02162 विशेष नागपूर येथून दि. ६.९.२०२० रोजी २१.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १०.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल. *थांबे* : दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा. *संरचनाः* १६ शयनयान, २ तृतीय वातानुकूलित, २ द्वितीय श्रेणी.

नाशिक रोड-नागपूर विशेष (2 फेऱ्या) 01263 विशेष नाशिक रोड येथून दि. ५.९.२०२० रोजी १६.१० वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी ०३.०० वाजता नागपूरला पोहोचेल. 01264 विशेष नागपूर येथून दि. ६.९.२०२० रोजी २१.३० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ०७.३० वाजता नाशिकरोडला पोहोचेल. *थांबे* : मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा. संरचनाः १६ शयनयान, ६ द्वितीय श्रेणी.

अमरावती- नागपूर मेमू विशेष (2 ट्रिप) 01139 मेमू विशेष अमरावती येथून दि. ६.९.२०२० रोजी ००.१५ वाजता (५/६.९.२०२० च्या मध्यरात्री) सुटेल आणि त्याच दिवशी ०५.२५ वाजता नागपूरला पोहोचेल. 01140 मेमू विशेष नागपूर येथून दि. ६.९.२०२० ला २३.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ०४.०० वाजता अमरावतीला पोहोचेल. *थांबा* : वर्धा. *संरचना*: ८ मेमू डब्बे

जळगाव - नागपूर मेमू स्पेशल (2फेऱ्या) 02165 मेमू विशेष जळगाव येथून दि. ५.९.२०२० रोजी २१.३० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०४.२० वाजता नागपूरला पोहोचेल. 02166 मेमु विशेष नागपूरहून दि. ६.९.२०२० रोजी २२.४५ वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी ०४.२० ​​वाजता जळगावला पोहोचेल. *थांबे* : भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा. *संरचना* : ८ मेमू डब्बे

अकोला-नागपूर मेमू विशेष (2फेऱ्या)  01141 मेमु विशेष अकोला येथून दि. ६.९.२०२० रोजी ००.३० वाजता (५/६.९.२०२० च्या मध्यरात्री) सुटेल व त्याच दिवशी सकाळी ०५.०० वाजता नागपूरला पोहोचेल. 01142 मेमु विशेष नागपूरहून दि. ६.९.२०२० रोजी २०.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी अकोला येथे २३.५५ वाजता पोहोचेल. *थांबे* : बडनेरा, वर्धा. *संरचना:* ८ मेमू डब्बे

अहमदनगर- नागपूर विशेष (2 फेऱ्या ) 02167 विशेष अहमदनगर येथून दि. ५.९.२०२० रोजी १६.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०४.०० वाजता नागपूरला पोहोचेल. 02168 विशेष नागपूर येथून दि. ६.९.२०२० रोजी २२.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी १०.४० वाजता अहमदनगरला पोहोचेल. *थांबे* : बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा. *संरचनाः* १८ शयनयान, ४ द्वितीय श्रेणी.

पनवेल-नागपूर विशेष (2फेऱ्या) 02169 विशेष पनवेल येथून दि. ५.९.२०२० रोजी १३.५० वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी ०३.३० वाजता नागपूरला पोहोचेल. 02170 विशेष नागपूरहून दि. ६.९.२०२० रोजी २२.३० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १२.०० वाजता पनवेल येथे पोहोचेल. *थांबे* : कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा. *संरचनाः* १३ शयनयान, ४ तृतीय वातानुकूलित, ५ द्वितीय श्रेणी.

बल्हारशाह - नागपूर मेमू विशेष (2 फेऱ्या)  01143 मेमु विशेष बल्हारशाह येथून दि. ६.९.२०२० (मध्यरात्री ५/६.९.२०२०) रोजी ००.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ०४.४५ वाजता नागपूरला पोहोचेल. 01144 मेमु विशेष नागपूर येथून ६.९.२०२० रोजी २३.१५ वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी ०४.०० वाजता बल्हारशाहला पोहोचेल. *थांबे* : चंद्रपूर, सेवाग्राम *संरचना* : ८ मेमू डब्बे

पुणे-अहमदाबाद स्पेशल (2 फेऱ्या ) 01145 विशेष दि. ५.९.२०२० रोजी १७.३० वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०५.४५ वाजता अहमदाबादला पोहोचेल. 01146 विशेष अहमदाबाद येथून दि. ६.९.२०२० रोजी २०.१५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ०८.०० वाजता पुण्याला पोहोचेल. *थांबे* : लोणावळा, कल्याण, वसई रोड, सूरत, वडोदरा *संरचनाः* १८ शयनयान २ द्वितीय श्रेणी.

मुंबई- मडगाव विशेष मार्गे पुणे-मिरज (2 फेऱ्या) 01147 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि. ५.९.२०२० रोजी ११.०५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०४.०० वाजता मडगावला पोहोचेल. 01148 विशेष मडगाव येथून ६.९.२०२० रोजी २०.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १३.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईला पोहोचेल. *थांबे* : दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, सांगली, मिरज, बेळगावी, लोंडा. *संरचनाः* १८ शयनयान, २द्वितीय श्रेणी.

कोल्हापूर - मडगाव विशेष (2 फेऱ्या)* 01149 विशेष कोल्हापूर येथून दि. ५.९.२०२० रोजी १९.३० वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी ०४.३० वाजता मडगावला पोहोचेल. 01150 विशेष मडगाव येथून दि. ६.९.२०२० रोजी २०.३० वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी ०५.३० वाजता कोल्हापूरला पोहोचेल. *थांबे* : मिरज, बेळगावी, लोंडा. *संरचनाः* ७ शयनयान, २ द्वितीय आसन श्रेणी,१५ द्वितीय श्रेणी

कोल्हापूर- धारवाड विशेष (2 फेऱ्या) 01151 विशेष कोल्हापूर येथून दि.५.९.२०२० रोजी २२.०० वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी ०४.५० वाजता धारवाडला पोहोचेल. 01152 विशेष धारवाड दि. ६.९.२०२० रोजी २१.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०४.०० वाजता कोल्हापूरला पोहोचेल. *थांबे* : मिरज, बेळगावी, लोंडा. *संरचनाः* २२ शयनयान, २ द्वितीय श्रेणी.

पुणे- धारवाड विशेष (2 फेऱ्या) 01153 विशेष पुणे येथून दि. ५.९.२०२० रोजी १७.०५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०५.५० वाजता धारवाडला पोहोचेल. 01154 विशेष धारवाड येथून दि. ६.९.२०२० रोजी २०.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ०७.५० वाजता पुण्याला पोहोचेल. *थांबे* : सातारा, सांगली, मिरज, बेळगावी, लोंडा. *संरचनाः* १५ शयनयान, ७ द्वितीय श्रेणी.

मुंबई- हैदराबाद विशेष (2 फेऱ्या)* 01157 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस दि. ५.९.२०२० रोजी १४.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०५.१५ वाजता हैदराबादला पोहोचेल. 01158 विशेष हैदराबाद येथून दि. ६.९.२०२० रोजी २१.१५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ११.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. *थांबे* : ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, सोलापूर, कलाबुरागी, वाडी, विकाराबाद, लिंगमपल्ली, बेगमपेट *संरचनाः* १२ शयनयान, ३ तृतीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, ३ द्वितीय श्रेणी.

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Howrah Train Accident : रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
Nashik News : वडिलांच्या निधनानंतर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, अंगावर रॉकेल टाकलं अन्...; बाप-लेकीची एकाच घरातून निघाली अंत्ययात्रा, नाशिकमधील घटना
वडिलांच्या निधनानंतर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, अंगावर रॉकेल टाकलं अन्...; बाप-लेकीची एकाच घरातून निघाली अंत्ययात्रा, नाशिकमधील घटना
Virat Kohli : देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024 Latest NewsABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024Anandache Paan : 780 भाषा शोधणारे पद्मश्री Ganesh Devi यांच्याशी 'द इंडियन्स'  या महाग्रंथाबद्दल गप्पा 25 January 2025Narhari Zirwal On Guardian Minister Post : आधी खदखद नंतर सारवासारव; नरहरी झिरवाल यांचं वक्तव्य चर्चेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Howrah Train Accident : रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
Nashik News : वडिलांच्या निधनानंतर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, अंगावर रॉकेल टाकलं अन्...; बाप-लेकीची एकाच घरातून निघाली अंत्ययात्रा, नाशिकमधील घटना
वडिलांच्या निधनानंतर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, अंगावर रॉकेल टाकलं अन्...; बाप-लेकीची एकाच घरातून निघाली अंत्ययात्रा, नाशिकमधील घटना
Virat Kohli : देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
Sheikh Hasina : पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
Narhari Zirwal : आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
Embed widget