एक्स्प्लोर
LIVE UPDATE दक्षिण गुजरातमध्ये भाजपची बाजी
दक्षिण गुजरात निवडणूक 2017 निकाल LIVE UPDATE
![LIVE UPDATE दक्षिण गुजरातमध्ये भाजपची बाजी south Gujarat assembly elections 2017 results live latest news, Elections Results News in marathi LIVE UPDATE दक्षिण गुजरातमध्ये भाजपची बाजी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/17074724/rahul_modi.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
गांधीनगर : दक्षिण गुजरात निवडणूक 2017 निकाल जाहीर होत आहेत. दक्षिण गुजरातमध्ये 35 पैकी 24 जागांवर भाजपने आघाडी घेतली असून काँग्रेस 11 जागांवर पुढे आहे.
गुजरातमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात सरकार येणार की सत्तापालट होऊन काँग्रेस सरकार स्थापन करणार हे आज स्पष्ट होणार आहे.
दक्षिण गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण जागा 35 जागा आहेत. गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागा असून 92 हा बहुमताचा आकडा आहे.
गुजरातचा एक्झिट पोल: दक्षिण गुजरातमध्ये कमळ फुलणार
दक्षिण गुजरातमध्ये भाजपचं कमळ फुलण्याची शक्यता एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. भाजपला 35 जागांपैकी 24, तर काँग्रेसला 11 जागा मिळण्याची चिन्हं आहेत. इतर किंवा अपक्षांना दक्षिण गुजरातमध्ये खातं उघडता येणार नसल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.गुजरातचा रणसंग्राम : निकालाचा क्षणाक्षणाचा थरार कसा पाहाल?
गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यांमधील 89 जागांसाठी 9 डिसेंबरला 68 टक्के मतदान झालं, तर दुसऱ्या टप्प्यासाठी 14 जिल्ह्यांमधील 93 जागांसाठी मतदान झालं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)