एक्स्प्लोर

देशाचे सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांचा राजीनामा

देशाचे सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याकडे कुमार यांनी शुक्रवारी आपला राजीनामा सुपूर्द केला.

नवी दिल्ली : देशाचे सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याकडे कुमार यांनी शुक्रवारी आपला राजीनामा सुपूर्द केला. वैयक्तीक कारणांमुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सॉलिसिटर जनरल हे पद न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित देशातील दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे. मोदी सरकारने कुमार यांची 2014 मध्ये सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती केली होती. या पदावर त्यांचा हा दुसरा कार्यकाळ होता. त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये गुजरात सरकारच्या वतीने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली. काही महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियम शीर्ष कमिटीसाठी न्यायमूर्ती म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होती. काय आहे कोलेजियम व्यवस्था? कोलेजियम म्हणजे पाच जणांचा समूह असतो. या पाच व्यक्तींमध्ये देशाचे मुख्य न्यायमूर्ती आणि सुप्रीम कोर्टाचे चार वरिष्ठ न्यायमूर्ती असतात. कोलेजियममध्ये न्यायमूर्तींच्या नियुक्तीची थेट तरतूद नाही. पण सुप्रीम कोर्टाचे पाच वरिष्ठ न्यायमूर्तींची ही (कोलेजियम) समिती न्यायमूर्तींची नियुक्ती आणि त्यांची बदलीचा निर्णय घेते. कोलेजियमच्या शिफारसी मान्य करणं सरकारसाठी बंधनकारक असतं. ही व्यवस्था 1993 पासून आमलात आहे. दुसरीकडे, काही महिन्यांपूर्वीच देशाचे मुख्य महाधिकवक्ता मुकुल रोहतगी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तसेच महाधिवक्तापदाच्या दुसऱ्या कार्यकाळाची जबाबदारी आपल्याला सोपवू नये, अशी रोहतगी यांनी सरकारला पत्र लिहून इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर जेष्ठ अधिवक्ता के.के.वेणूगोपाल यांची महाधिवक्ता पदावर नियुक्ती केली गेली. आता सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या सहकार्यांना लिहिलेल्या संदेशात, मी माझ्या वैयक्तीक कारणांमुळे पदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ऐकावं ते नवलच! तब्बल 3 हजार 400 वेळा तरुणानं प्रेयसीला घ्यायला लावलं गाडीचं चुंबन, पोलिसांनी अडवली गाडी, नेमकं प्रकरण काय?  
ऐकावं ते नवलच! तब्बल 3 हजार 400 वेळा तरुणानं प्रेयसीला घ्यायला लावलं गाडीचं चुंबन, पोलिसांनी अडवली गाडी, नेमकं प्रकरण काय?  
NDA मधून अधिकारी झाल्यावर किती मिळतो पगार? नेमक्या काय काय मिळतात सुविधा? जाणून घ्या सविस्तर माहिती 
NDA मधून अधिकारी झाल्यावर किती मिळतो पगार? नेमक्या काय काय मिळतात सुविधा? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन
ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं घेतला मोठा निर्णय, देशाच्या राजधानीत 800 टन कांदा दाखल, कमी दरात मिळणार कांदा 
ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं घेतला मोठा निर्णय, देशाच्या राजधानीत 800 टन कांदा दाखल, कमी दरात मिळणार कांदा 

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला, MPSC नं परीक्षा रद्द करताच रोहित पवारांचा दावा
FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला गेला : रोहित पवार
Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
Mumbai Ganeshotsav : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मंत्री दादा भुसे म्हणाले, काढायला लावणार, जुन्या फोटोचा नव्याने वाद
उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मंत्री दादा भुसे म्हणाले, काढायला लावणार, जुन्या फोटोचा नव्याने वाद
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
Embed widget