एक्स्प्लोर
Advertisement
बेळगावात पूरग्रस्त भागातील जवानांचा बकरी ईदच्या प्रार्थनेत सहभाग
गेल्या आठवडाभरापासून चिकोडी, अथणी आणि रायबाग तालुक्यात मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी महापुरात जीव धोक्यात घालत हजारो लोकांचे जीव वाचवले आहेत. याची दखल घेऊन शिरगुर गावच्या मुस्लिम बांधवांनी जवानांना दुपारी भोजनाचे आमंत्रण दिले होते.
बेळगाव : येथील पुरग्रस्तांच्या बचावासाठी हजर असलेल्या जवानांनी मुस्लिम बांधवांसोबत बकरी ईद साजरी करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे. पुरात अडकलेल्या लोकांचे जीव वाचवून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम करुन बचाव कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या 'मराठा लाईट इन्फंट्री'च्या जवानांनी बकरी ईदच्या विशेष प्रार्थनेत सहभागी होऊन एकतेचे उदाहरण दिले आहे.
देशभरात आज बकरी ईद साजरी करण्यात आली. बेळगावात दुपारी बाराहून अधिक जवान रायबाग तालुक्यातील शिरगुर गावात बकरी ईदच्या विशेष प्रार्थनेत सहभागी झाले होते. गेल्या आठवडाभरापासून चिकोडी, अथणी आणि रायबाग तालुक्यात मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी महापुरात जीव धोक्यात घालत हजारो लोकांचे जीव वाचवले आहेत. याची दखल घेऊन शिरगुर गावच्या मुस्लिम बांधवांनी जवानांना दुपारी भोजनाचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार जवानांनी मुस्लिम बांधवांसोबत सहभोजन केले.
जवानांचे मुस्लिम बांधवांसोबत भोजन आणि सामूहिक प्रार्थनेत सहभाग या गोष्टी समाजात सौहार्द वाढवणाऱ्या आहेत. मुसगुप्पी गावात 15 फूट खोल पाण्यात अडकलेल्या महिलेला जीवनदान देत पोहून सुरक्षितरित्या बाहेर काढणाऱ्या मेजर राठोड यांच्या साहसाचे विशेष कौतुक होत असून ते देखील सामूहिक प्रार्थनेत सहभागी झाले होते.जवानांचे हे उदाहरण देशात धार्मिक सलोखा जपण्यास आणि वाढण्यास प्रेरणा देणारे आहे.
कर्नाटकमध्ये बचाव पथकातलेच 5 जवान वाहून गेले, हेलिकॉप्टरद्वारे नदीतून सुटका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement