TRS : टीआरएसने गुजराती भाषेत बोचरे प्रश्न विचारले अन् भाजपने उर्दूमध्ये उत्तर देत केला पलटवार!
TRS आणि BJP मध्ये सध्या सोशल वाॅर सुरु आहे. पीएम मोदींना लक्ष्य करण्यासाठी टीआरएसने गुजराती भाषेचा अवलंब केला, तर एआयएमआयएमसोबत टीआरएस पक्षाचे घनिष्ठ संबंध ठळक करण्यासाठी भाजप उर्दूकडे वळला.
TRS आणि BJP मध्ये सध्या प्रचंड आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पोस्टर्सवरून सुरू असलेल्या या लढ्याने आता भाषिक रंग सुद्धा घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यासाठी टीआरएसने गुजराती भाषेचा अवलंब केला, तर एआयएमआयएमसोबत टीआरएस पक्षाचे घनिष्ठ संबंध ठळक करण्यासाठी भाजप उर्दूकडे वळला. अलिकडच्या काही महिन्यांत दोन्ही पक्षांमध्ये सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे, परंतु एकमेकांना लक्ष्य करण्यासाठी भिन्न भाषा वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
टीआरएसने आपल्या अधिकृत हँडलवरून पीएम मोदींसाठी गुजरातीमध्ये 8 प्रश्न पोस्ट केले आणि ते म्हणाले की ही भाषा पीएम मोदी यांना उत्तम समजते. त्यात इंधनाच्या किमती आणि महागाईपासून ते तेलंगणाकडून सापत्नभावाची वागणूक या मुद्द्यांवर त्यांची प्रतिक्रिया मागवली.
Modi Ji & his party have failed to recognise the unprecedented development TRS govt has done in Telangana. So here are Telangana achievements in the PM’s preferred language :
— TRS Party (@trspartyonline) July 2, 2022
તેલંગાણા માં આપનું સ્વાગત છે
1. અર્થતંત્રમાં ભારતનો ચોથો સૌથી મોટો ફાળો આપનાર રાજ્ય
(1/5)
भाजपने टीआरएसकडून 13 प्रश्नांची उत्तरे मागितली
टीआरएसकडून भाजपला गुजराती भाषेत 8 प्रश्न विचारण्यात आल्यानंतर भाजपने पलटवार करण्यासाठी उर्दूची निवड केली. ज्यामध्ये टीआरएस-एआयएमआयएम मैत्रीचे स्पष्ट संकेत आहेत. भाजपकडून टीआरएस सरकारच्या 13 'अपयशांवर' प्रश्न विचारण्यात आले. जसे शेतकरी आत्महत्या, सोनेरी तेलंगणाचे अधुरे स्वप्न आणि कर्जाचा प्रश्न. भाजपच्या एका नेत्याने सांगितले की आमच्या अल्पसंख्याक मोर्चाने त्यांच्या गुजराती ट्विटला उर्दूमध्ये उत्तर दिले.
People are frustrated with you, Mr KCR. You became deaf to the problems of Telangana.
— BJP Telangana (@BJP4Telangana) July 3, 2022
Let's see if Shri KCR and super CM from Darussalam will listen if we tell them in their preferred language.
1- کی سی آر کی حکمرانی میں خوشحال ریاست قرض میں ڈوب گئی#SaaluDoraSelavuDora
1/n https://t.co/Ax4TlNaMFo
या हॅशटॅगचा वापर झाला
पंतप्रधानांच्या तेलंगणा दौऱ्याची घोषणा होताच दोन्ही पक्षांनी एकमेकांचा प्रतिवाद करण्यासाठी अनेक हॅशटॅग तयार केले. "The BJP NEC in Telangana", "Team Modi in Telangana" आणि "Modi Aagaya, KCR Dargaya" असे हॅशटॅश भाजपने वापरले होते. त्याचवेळी टीआरएसने "Bye Bye Modi", "BJP Circus Modi" आणि "Modi Must Answer" असे हॅशटॅग वापरले.
इतर महत्त्वाच्या बातम्या