स्मृती इराणींचं वेट लॉस ट्रांसफॉर्मेशन; चाहते आश्चर्यचकित, मागत आहेत वजन कमी करण्याच्या टिप्स
स्मृती इराणी (Smriti Irani) या त्यांच्या राजकीय कार्यामुळे नेहमी चर्चेत असतात. त्या विरोधकांना सडेतोड उत्तर देत असतात.

Smriti Irani Transformation : स्मृती इराणी (Smriti Irani) या त्यांच्या राजकीय कार्यामुळे नेहमी चर्चेत असतात. त्या विरोधकांना सडेतोड उत्तर देत असतात. त्यांच्या या शैलीमुळे त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. अनेक वेळा स्मृती त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. त्या सोशल मीडियावर बऱ्याच अॅक्टिव्ह असतात. नुकताच स्मृती यांनी इंस्टाग्रामवर त्यांचा फोटो शेअर केला. या फोटोमधील स्मृती इराणी यांच्या फिटनेसने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
काही दिवसांपूर्वी स्मृती इराणी यांनी त्यांचा इंस्टाग्रामवरील प्रोफाइल फोटो बदलला. या फोटोमध्ये त्या गुलाबी रंगाची साडी आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहेत. तसेच नुकताच स्मृती यांनी बागेतील फोटो शेअर केला. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिले, 'जो पहुंच के पार है, वहीं पर बहार है…फुलं तोडू नका.' स्मृती इराणींच्या या फोटोमधील वेट लॉस ट्रांसफॉर्मेशन पाहून अनेकांनी कमेंट करत त्यांना वजन कमी करण्याच्या टिप्स विचारल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली, 'मॅडम तुम्ही खूप फिट दिसत आहात. वजन कमी करण्यासाठी काही टिप्स द्या.' अभिनेत्री मौनी रॉयने स्मृती यांच्या फोटोवर कमेंट केली, 'खूप सुंदर' . या पोस्टला 65,000 पेक्षा जास्त लोकांन लाइक केले आहे.
View this post on Instagram
Mimi Chakraborty iPhone: मिमी चक्रवर्तीच्या आयफोनमधून 7000 फोटो, 500 व्हिडिओ डिलीट
एकता कपूरच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’या मालिकेमुळे स्मृती इराणी यांना विशेष लोकप्रिया मिळाली. त्यानंतर त्यांनी अभिनय सोडून राजकारणात एन्ट्री केली. 2003 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Before You Go
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती






















