एक्स्प्लोर

आता आयटीआय पास विद्यार्थांना दहावी, बारावीचं प्रमाणपत्र

नवी दिल्लीः  आयटीआयचा कोर्स केलेल्या किंवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता अच्छे दिन येणार असल्याचं चित्र आहे. आयटीआय पास असलेल्या विद्यार्थ्यांना आता दहावी आणि बारावी पास गृहित धरलं जाणार आहे. केंद्र सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.     मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि कौशल्य विकास मंत्रालय यांच्यात महत्त्वाचा करार झाला आहे. या करारानुसार आयटीआय पास विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी पास असल्याचं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.     आयटीआयच्या विद्यार्थांना असा फायदा होईल आयटीआयचा कोर्स पूर्ण केल्यास आता प्रमाणपत्रासोबतच दहावी आणि बारावी पास असल्याचं प्रमाणपत्रही दिलं जाणार आहे. एखाद्या विद्यार्थाने दहावीनंतर कोर्स पूर्ण केल्यास त्याला बारावी पास गृहित धरलं जाईल. तर इयत्ता आठवी नंतर आयटीआय पूर्ण केल्यास दहावी पास गृहित धरलं जाणार आहे.     देशभरात लवकरच 1500 आयटीआय केंद्र केंद्र सरकारने देशातील विविध 2500 विभागांमध्ये आयटीआय केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या विभागामध्ये सध्या कौशल्य विकास आणि तांत्रिक शिक्षणाची कसलीही व्यवस्था नाही, अशा भागात हे केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. यापैकी 1500 आयटीआय केंद्र सुरु करण्याच्या प्रस्तावाला लवकरच कॅबिनेटची मंजुरी मिळवण्यात येणार आहे. सर्व आयटीआय सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी अर्थात पीपीपी या तत्त्वावर उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी दिली.     एवढंच नव्हे तर या वर्षापासून विद्यापीठांच्या धरतीवर आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दीक्षांत समारंभाचं आयोजन करण्यात येणार आहे. शक्य झाल्यास पहिल्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहतील, असंही रुडी यांनी सांगितलं.     आयटीआय करुन दहावी किंवा बारावीची डिग्री नसल्यामुळे नोकरीसाठी विद्यार्थ्यांची अडवणूक होते. त्यामुळं अनेकांना आयटीआय केल्याचा पश्चात्तापही होतो. मात्र केंद्र सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळं आयटीआयच्या विद्यार्थांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget