Shraddha Murder Case : फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे अन् आफताब दुसऱ्या तरुणीसोबत; कोण होती ही तरुणी? ओळख पटली
Shraddha Murder Case : श्रद्धा हत्य प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी आफताबची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
Mehrauli Murder Case : दिल्लीतील श्रद्धा वालकर ( Shraddha Murder Case ) हत्याकांडांने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून वेगाने तपास सुरु आहे. या प्रकरणात आता आणखी एक अपडेट समोर आली आहे. आरोपी आफताब पुनावालाने (Aftab Poonawala) श्रद्धा वालकरची ( Shraddha Walkar ) हत्या करून तिचा मृतदेह घरातील फ्रिजमध्ये ठेवला. यानंतर त्याने एका दुसऱ्या तरुणीला घरी बोलावलं होतं. आता 'त्या' तरुणीची ओळख पटली आहे. ही तरुणी व्यवसायाने साइकॉलजिस्ट ( Psychologist ) आहे. दिल्ली पोलिसांनी ( Delhi Police ) या तरुणीला संपर्क करत तिची चौकशी केली आहे. आरोपी आफताबने डेटिंग ॲप बंबल ( Bumble ) वरून एका तरुणीशी संपर्क करून तिला घरी बोलावलं होतं. याचं घरातील फ्रिजमध्ये श्रद्धाचा मृतदेह होता.
'त्या' तरुणीची ओळख पटली
आरोपी आफताबने श्रद्धाचा निर्घूनपणे खून करत तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. त्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर एका या तरुणीला घरी बोलावलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, आफताबच्या घरी आलेली तरुणी मनोचिकित्सक आहे. पोलिसांनी या तरुणीची ओळख पटवली असून पोलिसांनी तिची चौकशी केली आहे.
आफताबची न्यायालयीन कोठडीत रवानगी
श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी आफताबची आंबेडकर रुग्णालयातून वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आंबेडकर रुग्णालयातच न्यायालयाची सुनावणी घेण्यात आली. विशेष सीपी कायदा आणि सुव्यवस्था सगरप्रित हुडा यांनी सांगितलं की, दिल्ली पोलिसांना दंडाधिकारी न्यायालयाकडे विनंती केली होती की, आंबेडकर रुग्णालयातच सुनावणी घेण्यात यावी. त्या विनंती नंतर ही सुनावणी घेण्यात आली आणि आफताबला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आता आफताबची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे.
28 नोव्हेंबरला आफताबची नार्को टेस्ट
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाची नार्को टेस्ट (Narco Test) 28 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे की, श्रद्धाच्या मृतदेहाची डीएनए रिपोर्ट अद्याप मिळालेली नाही. 25 नोव्हेंबरला आरोपी आफताबची पॉलिग्राफ टेस्ट होणार होती, मात्र त्याची तब्येत ठिक नसल्याने ही टेस्ट झाली नाही. श्रद्धा हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून तपास सुरु आहे. आफताबने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि ते महरौलीच्या जंगताल फेकून दिले. पोलिसांना श्रद्धाच्या मृतदेहाचे काही अवशेष सापडले असून त्यांचा डीएनए रिपोर्ट येणं बाकी आहे.