एक्स्प्लोर

Narco Test: आफताबची नार्को चाचणी: आरोपीकडून सत्य वदवून घेणारे इंजेक्शन आहे तरी काय?

What Is Narco Test: श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पुनावाला याची नार्को चाचणी करण्यात येणार आहे. मात्र, नार्को चाचणीत देण्यात येणारे इंजेक्शन असते तरी काय, जाणून घ्या...

What Is Narco Test: श्रद्धा वालकर हत्याकांडातील (Shraddha Murder Case) आरोपी आफताब पूनावाला (Aftab Poonawalla) याची नार्को चाचणी (Narco Test) करण्यात येणार आहे. बुधवारी पॉलिग्राफ चाचणी झाल्यानंतर ही नार्को चाचणी पार पडणार आहे. नार्को चाचणीद्वारे पोलीस हे आफताबकडून अधिकाधिक सत्य माहिती बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या चाचणीच्या पूर्वी आफताबला Truth Drug चे एक इंजेक्शन देण्यात येईल. हे इंजेक्शन सत्य वदवून घेणारे औषध म्हणून ओळखले जाते. 

हे औषध मानवी मेंदूला प्रभावित करते आणि खोट सांगण्यापासून रोखले जाते. Truth Drug मध्ये सोडियम पेंटोथल नावाचे केमिकल असते. हे केमिकल मानवी शरीरात जातात संबंधित व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत जातो. मात्र, हे सर्व औषधाच्या डोसच्या प्रमाणावर अवलंबून आहे. एखाद्या शस्त्रक्रियेच्या वेळीदेखील या औषधाचा वापर केला जातो. 

सोडियम पेंटोथल इंजेक्शन दिल्यावर काय होते?

सोडियम पेंटोथल इंजेक्शन दिल्यानंतर संबंधित व्यक्ती बेशुद्धावस्थेत जाते. मात्र, नार्को चाचणीत याचे प्रमाण कमी ठेवले जाते, जेणेकरून आरोपी पूर्णपणे बेशुद्ध होता कामा नये. अर्ध बेशुद्ध अवस्थेत असताना आरोपीला प्रश्न विचारण्यास सुरुवात होते. या स्थितीत ती व्यक्ती खोट बोलू शकत नाही. मेंदू खोटी गोष्ट सांगण्याच्या स्थितीत नसतो.

Truth Drug चा वापर 1920 मध्ये सुरू झाला होता.  या औषधाचा वापर सीआयए, पोलीस आणि नाझी गुप्तहेरांनी केला. चौकशीशिवाय, याचा वापर विविध प्रयोगादरम्यान देखील केला जातो. 

औषध म्हणून वापर

औषध म्हणून सोडियम पेंटोथलचा वापर केला जातो. पेंटोथल इंजेक्शनमध्ये थियोपेंटल सोडियम औषध असते. पेटोंथलचा वापर गुंगी देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एनेस्थिसिया औषधात करण्यात येतो. पेटोंथल इंजेक्शन हे रुग्णालयात विशेषतज्ज्ञाकडूनच दिले जाते. या औषधाचा वापर हा गुंगी देण्यासाठी, मांसपेशींना आराम देण्यासाठी आणि रक्तदाब कमी करण्यासाठीदेखील केला जातो.  

पेंटोथलचे दुष्परिणाम काय?

एखाद्या व्यक्तीला अस्थामा अथवा कार्डियोव्हॅस्क्यूलर आजार असेल तर पेंटोथल इंजेक्शनचा वापर करण्याआधी डॉक्टरांना कल्पना असणे आवश्यक आहे. अशा रुग्णांना हे औषध देताना काळजी घेतली जाते. या इंजेक्शनच्या वापरामुळे उलटी येणे, वेदना, मळमळ होणे आदी त्रास जाणवू शकतो. हे औषध घेतल्यानंतर मद्य प्राशन न करण्याचा सल्ला दिला जातो. या औषधाच्या वापराने सुस्ती येते.  त्वचेवर व्रणही दिसण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तीला औषध दिले जाते, त्याला वाहन न चालवण्याचा सल्लाही दिला जातो. 

धोकादायक ठरू शकतो वापर

अतिरिक्त डोस घेतल्याने एखाद्या व्यक्तीचे प्राणदेखील जाऊ शकते. मर्लिन मुनरो, जुडी गारलँड आणि जिमी हेंड्रिक्स आदी कलाकारांचा मृत्यूदेखील अधिक डोसमुळे झाला. वर्ष 2011 च्या पूर्वी अमेरिकेत गुंगीचे औषध म्हणून याचा वापर केला जात होता. त्यानंतर याच्या वापरावर बंदी आणली गेली. या औषधाची निर्मिती करणाऱ्या कंपनीने उत्पादन थांबवले. इटली सरकारकडून मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी याचा वापर होईल अशी भीती कंपनीला होती. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget