(Source: ECI/ABP News/ABP Majha)
युवासेनेचं थाळी बजाओ आंदोलन, महागाईविरोधात राज्यभरात थाळीनाद करत केंद्र सरकारचा निषेध
Shivsena Protest Against Inflation : राज्यात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. याचा निषेध करण्यासाठी आज युवासेनेकडून राज्यभरात केंद्र सरकारविरोधात थाळी बजाओ आंदोलन करण्यात आलं आहे.
Yuvasena Protest Against Inflation : राज्यात वाढत्या महागाईने उच्चांक गाठला आहे. यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ सुरुच आहे. गॅस सिलिंडरचे भावही वाढले असून बँक व्यवहारात महागाईची झळ बसत आहे. वाढत्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना युवा कार्यकर्त्यांनी केला आहे. याचा निषेध करण्यासाठी आज युवासेनेकडून राज्यभरात थाळी बजाओ आंदोलन करण्यात आलं आहे. राज्यभरात थाळी नाद करत मोदी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. युवासेनेकडून मुंबई धुळे, बीड, यवतमाळ, जळगाव, वाशिमसह थाळी बजाओ आंदोलन करण्यात आलं.
बीडमध्ये युवसेनेच्या वतीने साठे चौकात थाळी नाद आंदोलन करण्यात आले आणि मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर जळगावातील नशिराबाद येथे वाढत्या महागाईचा निषेध म्हणून मोदी सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी 'थाली बजाओ और खुशिया मनाओ' हे अनोखे आंदोलन करण्यात आले. थाळी वाजवत मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत युवसेनेतर्फे हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
वाढत्या महागाईच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये युवासेनेच्या वतीने थाळी बजाओ आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी युवासेनेच्या वतीने नागरिकांना गाजर वाटप करण्यात आले. धुळे शहरातील भगवा चौक येथील शिवसेना कार्यालयापासून स्वस्तिक चित्रपटगृह पर्यंत हे थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले, या आंदोलनात युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. वाढत्या महागाईमुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे मात्र दिवसेंदिवस महागाईचा उच्चांक वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यभर युवा सेनेच्या वतीने प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.
पाहा व्हिडीओ : राज्यभरात युवासेनेचं इंधन दरवाढीमुळे 'थाली बजाओ आंदोलन'
टिटवाळा येथेही महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज टिटवाळा येथे महागाई विरोधात निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या निषेध मोर्चात हातात निषेधाचे फलक घेत तिन्ही पक्षांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चात मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. टिटवाळा स्टेशन परिसरात महाविकास आघडीच्या महिला कार्यकर्त्यानी भाकरी थापून तसेच महागाईच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत मोदी सरकारचा निषेध नोंदवला .
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Petrol Diesel Price : इंधन दरवाढ कायम, पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं, 13 दिवसांत 8 रुपयांची दरवाढ, पाहा आजचे दर
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1096 रुग्ण, 81 जणांचा मृत्यू
- Adani : अदानींनी मुकेश अंबानी आणि झुकेरबर्गला मागे टाकलं, जगातील टॉप 10 श्रीमंतांमध्ये सामील, जाणून घ्या किती आहे संपत्ती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha